रेल्वे मंत्रालय
सणांच्या काळासाठी रेल्वे सुरक्षा बलाने केल्या प्रवाशांसाठी मार्गदर्शक सुचना जारी
या कृती कोरोना विषाणू प्रसारास मदत करत असल्यामुळे या कृती करणाऱ्यास भारतीय रेल्वे दंडविधान मधील 145, 153 आणि 154 कलमांनुसार तुरुंगवास आणि/ किंवा दंड आकारण्यात येईल.
Posted On:
14 OCT 2020 7:26PM by PIB Mumbai
सणांचा येणारा मोसम लक्षात घेउन रेल्वे सुरक्षा बलाने प्रवाशांसाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या. सर्वसामान्य प्रवाशांनी रेल्वे स्थानकावर वा रेल्वे परिसरामध्ये खालील गोष्टी टाळाव्यात
1) मुखपट्टी न लावणे वा व्यवस्थित न लावणे.
2) अंतर अवकाशाचे (सोशल डिस्टंसिंगचे) पालन न करणे.
3) कोविड बाधित म्हणून स्पष्ट झाल्यावरही रेल्वे परिसरात, रेल्वे स्थानकात प्रवेश करणे वा गाडीत चढणे
4) कोरोना विषाणू चाचणीसाठी नमूना दिला असून निदान अद्याप प्राप्त झाले नसतानाही रेल्वे स्थानक वा परिसरात प्रवेश करणे किंवा गाडीत चढणे.
5) रेल्वे स्थानकातील आरोग्य तपासणी करणाऱ्या गटाने प्रवासास अनुमती दिली नसतानाही गाडीत चढणे
6) सार्वजनिक भागात थुंकणे वा शरीरातील कोणतेही द्रव पदार्थ उत्सर्जित पदार्थ टाकणे.
7) स्वच्छता वा अनारोग्यकारक अशी सार्वजनिक आरोग्यास बाधा उत्पन्न करणारी कोणतीही कृती वा सार्वजनिक सुरक्षेस बाधा आणणारी कृती रेल्वे स्थानक वा गाडीत करणे.
8) कोरोनोविषाणू संसर्गाला प्रतिबंध करण्यासाठी रेल्वे पोलिसांनी जारी केलेल्या मार्गदर्शक सुचनांचे पालन न करणे.
9) कोरोना विषाणूंच्या संसर्गाला मदत होईल अश्या प्रकारचे कोणतेही इतर कृत्य.
या कृती कोरोना विषाणू प्रसारास मदत करत असल्यामुळे त्या करणे हे रेल्वेप्रशासनाने प्रवाशांना दिलेल्या सोयींमध्ये ढवळाढवळ करण्यासारखे आहे. या कृती वा प्रतिबंध स्वतः न पाळणे किंवा धोक्याकडे दुर्लक्ष करून रेल्वे स्थानकावरील अथवा गाडीतून प्रवास करणाऱ्या एखाद्या व्यक्तीची सुरक्षा धोक्यात आणणे हा गुन्हा असून भारतीय रेल्वे दंडविधान मधील 145, 153 and 154 कलमांनुसार त्यासाठी तुरुंगवास आणि/ किंवा दंड आकारण्यात येईल.
M.Chopade/V.Sahajrao/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1664470)
Visitor Counter : 314