इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय

मत्स्यशेती आणि संबंधित पर्यायी शेती तंत्रामुळे शेतकऱ्याची उत्पादकता आणि उत्पन्न वाढवण्यात मदत होईलः संजय धोत्रे


केंद्रीय शिक्षण, संचार आणि माहिती तंत्रज्ञान राज्य मंत्री संजय धोत्रे यांनी लुधियानाच्या गडवासु येथे ‘एक्वापॉनिक्स सुविधा’ या प्रायोगिक प्रकल्पाचे केले उद्‌घाटन

Posted On: 13 OCT 2020 9:40PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 13 ऑक्टोबर 2020

शेतकऱ्यांची स्थिती सुधारण्यासाठी मत्स्यशेती (अ‍ॅक्वापॉनिक्स)  आणि संबंधित पर्यायी शेती तंत्रांची अत्यंत आवश्यक आहे. या तंत्रामुळे शेतकऱ्याला त्याच्या जमिनीची  उत्पादकता वाढवण्यात आणि त्याचे उत्पन्न वाढवण्यात मदत होईल, असे केंद्रीय शिक्षण, संचार आणि  इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री संजय धोत्रे यांनी म्हटले आहे.  गुरू अंगद देव पशुवैद्यकीय विद्यापीठ (जीएडीव्हीएएसयू), लुधियाना येथे सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ ऍडवान्सड कंप्यूटिंगने  (सी-डाक ) विकसित केलेल्या ‘अ‍ॅक्वापॉनिक्स सुविधा’ या प्रायोगिक प्रकल्पाचे उद्‌घाटन आज सी-डॅक, मोहाली इथून त्यांनी केले. अशा प्रकारच्या तंत्रज्ञानाचा जनतेमध्ये  झपाट्याने प्रसार होण्यासाठी असे आणखी बरेच प्रकल्प हाती घेण्यात यावेत अशी सूचना धोत्रे यांनी केली.

अत्याधुनिक सुविधा ही प्रदेशातली पहिलीच सुविधा असून देखरेखीसाठी आणि स्वयंचलित नियंत्रणासाठी प्रगत सेन्सर्सनी सुसज्ज आहे. इलेक्ट्रॉनिक आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या अनुदान सहाय्याने हे विकसित केले आहे. यावेळी बोलतांना सी-डाक  मोहालीचे कार्यकारी संचालक डॉ. पी.के. खोसला म्हणाले, ही सुविधा जवळपास 100 टक्के सेंद्रिय आहे, पीक येण्याकरता फार कमी जागेची आवश्यकता आहे, 90 % कमी पाण्याचा वापर , अशा पद्धतीने शेती केलेले मासे आणि पिके अधिक पौष्टिक आहेत.

सी-डॅकचे महासंचालक डॉ. हेमंत दरबारी यांनी कृषी क्षेत्रात सी-डॅकच्या विविध उपक्रमांची माहिती दिली आणि मोहालीच्या सी-डॅकच्या प्रयत्नांचे कौतुक केले.  इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या विशेष सचिव आणि वित्त सल्लागार ज्योती अरोरा,यांनी भारतीय अर्थव्यवस्थेतील शेतीचे महत्त्व आणि कृषी क्षेत्राच्या उन्नतीसाठी तंत्रज्ञानाची आवश्यकता असल्याचे  सांगितले.  या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने ग्रामीण भागातील महत्वाकांक्षी तरुणांना मुख्य प्रवाहात आणले जाईल आणि कृषी-अर्थव्यवस्थेला चालना मिळेल.असे त्या म्हणाल्या.

यावेळी बोलताना गाडवासू विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. इंद्रजीत सिंह यांनी नमूद केले की, शहरी भागात मासे आणि अशा पिकांची मागणी वेगाने वाढत आहे आणि अशा प्रकारच्या व्यवस्थेने  शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यात विशेषतः बिगर  किनारपट्टी भागात मदत केली पाहिजे.

एक्वापॉनिक्स एक उदयोन्मुख तंत्र आहे ज्यामध्ये मासे आणि  वनस्पती एकत्रित पद्धतीने वाढवले जातात.  माशांचा कचरा  हा वाढणाऱ्या रोपांना खत पुरवतो. झाडे पोषकद्रव्ये शोषून घेतात आणि पाणी शुद्ध करतात. हे शुद्ध  केलेले पाणी माशाची टाकी पुन्हा भरण्यासाठी वापरले जाते. हे पर्यावरण अनुकूल तंत्र आहे. सी--डॅकचे महासंचालक डॉ. हेमंत दरबारी यांनी सांगितले की सी-डॅककडून पुरविण्यात येत असलेली सुपर कम्प्युटिंग  ऊर्जा कृषी तंत्रज्ञान विकसित करण्यात उपयुक्त ठरेल.

 

B.Gokhale/S.Kane/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1664159) Visitor Counter : 168