गृह मंत्रालय

केंद्रीय गृह राज्यमंत्री जी. किशन रेड्डी यांनी 21 व्या ‘ऑल इंडिया कॉन्फरन्स ऑफ डायरेक्टर्स, फिंगरप्रिंट ब्यूरो – 2020’ चे उद्‌घाटन केले


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार गुन्हेगारी आणि दहशत खपवून घेणार नाही

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा गुन्हेगारीमुक्त भारताच्या निर्मितीवर विश्वास ठेवतात आणि आमच्या सरकारचे उद्दीष्ट जात-पात, धर्म, आणि प्रांत यापुढे जाऊन गुन्हेगारीचे उच्चाटन करणे हे आहे

Posted On: 13 OCT 2020 3:48PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 13 ऑक्टोबर 2020

केंद्रीय गृह राज्यमंत्री  जी. किशन रेड्डी यांनी 21 व्या ‘ऑल इंडिया कॉन्फरन्स ऑफ डायरेक्टर्स, फिंगरप्रिंट ब्यूरो – 2020’ चे  डिजीटल उद्घाटन केले तसेच राष्ट्रीय गुन्हे नोंद ब्युरो (एनसीआरबी) ने स्थापन केलेल्या ई-सायबर लॅबचे उद्‌घाटन केले.

यावेळी  जी. किशन रेड्डी आपल्या भाषणात म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार गुन्हेगारी आणि दहशतवादाप्रति शून्य सहनशीलतेवर विश्वास ठेवते. मोदी सरकार  हे खपवून घेणार नाही . केंद्रीय गृहमंत्री  अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली गुन्हेमुक्त भारत निर्माण करण्याचे आमचे उद्दीष्ट असल्याचे ते पुढे म्हणाले. जी. किशन रेड्डी म्हणाले की जाती, पंथ, धर्म,  किंवा प्रदेशच्या भिंगातून  कोणत्याही गुन्ह्याकडे  पाहण्यावर सरकार विश्वास ठेवत नाही, कारण गुन्हा मानवता आणि शांतीविरूद्ध आहे आणि सरकार महिला आणि वंचितांविरोधात गुन्हे कदापि सहन करणार नाही. सर्व पीडितांना जलद आणि निर्णायक न्याय मिळवून देण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करेल.

जी. किशन रेड्डी म्हणाले की कायदा आणि सुव्यवस्था हा राज्याचा विषय असला तरी पोलिस दलांच्या आधुनिकीकरणात आणि क्षमता वाढवण्यात तसेच कायदा आणि सुव्यवस्था राखण्यात राज्य सरकारांना मदत करण्यात केंद्र सरकारची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. ते पुढे म्हणाले की केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पोलिस दलांच्या आधुनिकीकरणाच्या महत्वावर भर दिला. 2019-20 या आर्थिक वर्षात केंद्र सरकारने देशभरातील  पोलिसांच्या आधुनिकीकरणासाठी 780 कोटी रुपये दिले.

फिंगरप्रिंटसचे  महत्त्व अधोरेखित करताना रेड्डी म्हणाले की फिंगरप्रिंट हे त्याचे वैशिष्ट्य,  कायमस्वरूपीपणा, वैयक्तिकता आणि अधिग्रहणात सुलभतेमुळे एक आवश्यक साधन आहे. ते म्हणाले की, गुन्हे आणि गुन्हेगारांचे दस्तावेज आणि शोध घेण्यात नोंदी  आणि फिंगरप्रिंट डेटाचे डिजिटायझेशन एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. त्यांनी आत्मविश्वास व्यक्त केला की संपूर्ण संगणकीकृत राष्ट्रीय स्वयंचलित फिंगरप्रिंट आयडेंटिफिकेशन सिस्टम (नाफीस) लवकरच कार्यरत  होईल आणि पोलिस दलाला फायदा होईल.

आर्ट सायबर फॉरेन्सिक टूल्सच्या सहाय्याने एनसीआरबीने स्थापित केलेल्या ईसायबर  लॅबचे उद्‌घाटन करताना किशन रेड्डी म्हणाले की, ऑक्टोबर महिना हा राष्ट्रीय सायबर सुरक्षा जनजागृती  महिना म्हणून साजरा केला जातो आणि सायबर गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी ई-सायबर  लॅब  मदत करेल.

एनसीआरबीचे संचालक रामफल पवार म्हणाले की, एनसीआरबीबरोबर भागीदारीमध्ये नॅशनल आटोमेटेड फिंगर प्रिंट सिस्टम (नाफीस ) हा गेम चेंजर असेल. वास्तविक  तत्त्वावर फिंगरप्रिंट्सच्या आधारे गुन्हेगारांची ओळख पटवण्यासाठी नाफिस तपास अधिकाऱ्यांना मदत देखील पुरवेल.

केंद्रीय गृह मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी, गुजरात, राजस्थान आणि मध्य प्रदेशातील एनसीआरबीच्या तिन्ही प्रशिक्षण केंद्रांचे अधिकारी  व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थित होते.

 

M.Iyengar/S.Kane/P.Malandkar

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1663992) Visitor Counter : 152