रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय

गडकरी केरळमध्ये 8 राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचे शिलान्यास आणि उद्घाटन करणार


केरळच्या आर्थिक समृद्धीला चालना देण्यासाठी 200 किलोमीटरपेक्षा जास्त लांबीच्या महामार्गाच्या कामांसाठी 12,692 कोटी खर्च करणार

Posted On: 12 OCT 2020 8:34PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 12 ऑक्टोबर 2020


केंद्रीय रस्ते, वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी उद्या केरळमध्ये विविध महामार्गांच्या कामांचा प्रारंभ करणार आहेत तसेच काही रस्त्यांचे उद्घाटन करणार आहेत. गडकरी 8 राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचे शिलान्यास उद्या करणार आहेत. या कार्यक्रमाला राज्यपाल अरिफ मोहम्मद खान, राज्याचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन आणि  केंद्रीय राज्यमंत्री निवृत्त जनरल डॉ. व्हि.के.सिंग आणि राज्यातले मंत्री व्ही मुरलीधरन, खासदार आणि आमदार तसेच केंद्र आणि राज्य सरकारचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार आहेत.

यावेळी कझाकूट्टम ते मुक्कोला या 27 किलोमीटरच्या रस्त्याचे उद्घाटन होणार आहे. या मार्गासाठी 1,121 कोटी रुपये खर्च आला आहे. गडकरी उद्या ज्या मार्गांचे काम सुरू करणार आहेत, त्यांच्यासाठी अंदाजे 12,692 कोटी रुपये खर्च येणार आहे. केरळमधल्या साधारण 200 किलोमीटरपेक्षा जास्त लांबीच्या रस्त्यांच्या कामाला उद्या प्रारंभ करण्यात येणार आहे.

रस्त्यांच्या कामाचा तपशील पुढील प्रमाणे आहे:-

Sr. No

Name of Project

Length

(km)

Total Project

Cost (Rs. in Cr.)

1

Six laning of Thalapady  Km. 17.200 to Changala Km. 57.200  of  NH-66 (Old NH-17)

39

1981.07

2.

Six laning of Changala Km. 57.200 to  Neleshwaram Km. 95.650 of NH-66  (Old NH-17)

37.27

1746.45

3.

Six laning of Neleshwaram town to Thalipparamba  Km  96.450   to Km. 137.900 NH-66  (Old NH-17)

40.11

3041.65

4.

Six laning of Thalipparamba to Muzhapilangad Km 137.900   to Km. 170.600 NH-66 (Old NH-17)

29.95

2714.6

5.

Six laning of Paloli Palam and  Moodadi Bridge & allied works NH-66 (Old NH-17)

2.1

210.21

6.

Six laning of Kozhikode Bypass km.230.400 to km 258.800 NH-66 (Old NH-17)

28.4

1853.42

7.

Construction of High Level Bridge over Cheruthoni River at km 32/500 on NH-185

0.30

23.83

TOTAL

177 Km.

Rs. 11,571 Cr.

   
* * *

M.Chopade/S.Bedekar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1663817) Visitor Counter : 106