ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक पुरवठा मंत्रालय

खरीप विपणन हंगाम 2020-21साठी किमान आधारभूत किंमत प्रक्रिया सुरू


खरीप विपणन हंगाम 2020-21 साठी खरेदी करणाऱ्या  विविध राज्यांतून आणि काही राज्यांतून नव्याने आलेल्या खरेदीच्या प्रस्तावांमुळे तांदूळ खरेदी प्रक्रिया गतीमान झाली आहे.

10 ऑक्टोबरपर्यंत  खरेदीसाठी  मुगाची किमान आधारभूत किंमत 3.33कोटी रुपये, खोबऱ्याची  52.40 आणि कापसाची किमान आधारभूत किंमत 75.45कोटी रुपये इतकी आहे.

Posted On: 11 OCT 2020 9:07PM by PIB Mumbai

 

2020-21या वर्षीचा खरीप विपणन हंगाम सुरु झाला असून, सरकारने शेतकऱ्यांकडून मागील हंगामाप्रमाणेच किमान आधारभूत किंमतीत खरेदी प्रक्रिया सुरू केली आहे.

खरेदी विपणन हंगाम 2020-21साठी तांदूळ खरेदी प्रक्रियेला गती मिळाली असून, काही राज्यांनी खरेदीसाठी मंजुरी दिली असून काही राज्ये त्यात नव्याने सामील होत आहेत.भारतीय खाद्य महामंडळ(निगम)आणि काही सरकारी मुख्य संस्थांमार्फत 10 आँक्टोबर2020 पर्यंत  37.92लाख मेट्रिक टन तांदळाची खरेदी झाली असून,3.22 लाख शेतकऱ्यांकडून 7159.39 कोटी रुपयांच्या तांदळाची किमान आधारभूत किंमतीत खरेदी झाली आहे.

डाळी आणि तेलबियांच्या खरेदीसाठी तामिळनाडू, कर्नाटक, महाराष्ट्र, तेलंगणा, गुजरात, हरीयाणा,उत्तर प्रदेश ,ओदिशा आणि आंध्रप्रदेश या राज्यांनी दिलेल्या खरेदीच्या प्रस्तावांनुसार  30.70 लाख मेट्रिक टन डाळी आणि तेलबियांच्या खरेदीला मंजूरी दिली आहे. या व्यतिरिक्त 1.23 लाख मेट्रिक टन सुक्या खोबऱ्याच्या(बारमाही पीक) खरेदीसाठी आंध्रप्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू आणि केरळ या राज्यांनी देखील मंजूरी दिली आहे. तसेच राज्ये/केंद्रशासित प्रदेशांना किमान आधारभूत किंमत योजनेअंतर्गत   डाळी,तेलबिया आणि सुक्या खोबऱ्याच्या खरेदीचे प्रस्ताव प्राप्त झाल्यानंतर  मान्यता दिली जाईल ,जेणेकरुन या पीकांच्या एफ एक्यू ग्रेडची खरेदी वर्ष 2020-21च्या अधिसूचित किमान आधारभूत किंमतीवर थेट शेतकऱ्यांकडून करता येईल,परंतु राज्यांनी  मंजुरी दिलेल्या खरेदी संस्थांमार्फत केंद्रीय नोडल एजन्सी द्वारे राज्य/केंद्रशासित प्रदेशांमधील अधिसूचित काढणीच्या कालावधीत बाजारातील दर  एमएसपीच्या खाली असेल तर ते शक्य होईल.

10 आँक्टोबर 2020 पर्यंत सरकारने नोडल संस्थांमार्फत किमान आधारभूत किंमतीवर आधारीत  3.33कोटी रुपयांचा  459.60 मेट्रिक टन मूग खरेदी केला असून त्याचा तामिळनाडू आणि हरीयाणा येथील 326 शेतकऱ्यांना लाभ झाला. त्याचप्रमाणे 5089 मेट्रीक टन सुके खोबरे 52.40कोटी रुपये इतक्या किमान आधारभूत किमतीला  खरेदी केले ,ज्याचा लाभ कर्नाटक आणि तामिळनाडू मधील 3961शेतकऱ्यांना झाला.उडीद आणि सुके खोबरे यांच्या बाबतीत मुख्य उत्पादक राज्यातील दर किमान आधारभूत किमतीपेक्षा जास्त आहेत.मूग व इतर खरीप कडधान्ये आणि तेलबिया यांच्या संदर्भात बाजारात येणाच्या तारखेच्या आधारे संबंधित राज्यांनी ठरविलेल्या तारखेपासून संबंधित राज्य / केंद्रशासित प्रदेशात निश्चित तारखेला प्रारंभ करण्याकरिता सरकारआवश्यक व्यवस्था करीत आहेत.

2020-21 खरीप विपणन हंगामासाठी 1 ऑक्टोबरपासूनच कापूस खरेदी प्रक्रिया सुरु झाली आहे आणि 10 ऑक्टोबर 2020 पर्यंत कापूस महासंघाकडून  एकूण 24,863 गाठी कापूस किमान आधारभूत किंमतीत 7545 लाख रुपयांना खरेदी केला आहे, ज्याचा 5252 शेतकऱ्यांना लाभ झाला आहे.        

*****

B.Gokhale/S.Patgaonkar/P.Kor

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1663602) Visitor Counter : 192