रसायन आणि खते मंत्रालय

रासायनिक कीटकनाशकांना सुरक्षित पर्याय देत आयपीएफटी या संस्थेने मसाला पिकांसाठी विकसित केले जैव-कीटकनाशक द्रव्य

Posted On: 09 OCT 2020 5:40PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 9 ऑक्‍टोबर 2020

 

केंद्रीय रसायने आणि खत मंत्रालयाच्या रसायने आणि खनिज तेल रसायन विभागाच्या आधिपत्याखालील  आयपीएफटी अर्थात कीटकनाशक द्रव्य तंत्रज्ञान संस्थेने राजस्थानमधील अजमेरच्या एनआरसीएसएस संशोधन केंद्राच्या संयुक्त सहकार्याने व्हर्टिसिलीयम लेकॅनी या बुरशीचा वापर करून नवे जैव-कीटकनाशक शोधून काढले आहे.

हे नवे जैव-कीटकनाशक मेथी, जिरे तसेच धणे यासारख्या मसाल्याच्या पिकांचे नुकसान करणाऱ्या कीटकांचा नायनाट करण्यात यशस्वी ठरले आहे, असे  आयपीएफटीचे संचालक जितेंद्र कुमार यांनी सांगितले. हे नवे जैव-कीटकनाशक टिकाऊ, वापरकर्त्याच्या आणि पर्यावरणाच्या दृष्टीने सुरक्षित आहे आणि मसाला पिकांची हानी करणाऱ्या विविध कीटकांवर नियंत्रण मिळविण्यात यशस्वी ठरले आहे अशी माहिती त्यांनी दिली.

दर वर्षी विविध प्रकारच्या कीटकांमुळे मसाल्याच्या पिकांचे मोठे नुकसान होत असते, या कीटकांपासून संरक्षण मिळविण्यासाठी कृत्रिम रासायनिक कीटकनाशकांचा मोठ्या प्रमाणावर वापर होतो, त्यातील रसायनांमुळे मानवी आरोग्य आणि पर्यावरणाला धोका निर्माण होतो. ही परिस्थिती टाळण्यासाठी नवे जैव-कीटकनाशक अत्यंत उपयुक्त ठरेल असे आयपीएफटीने प्रसिध्द केलेल्या निवेदनात म्हटले आहे.


* * *

M.Chopade/S.Chitnis/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1663181)