अर्थ मंत्रालय
सरकारी तिजोरीला 61 कोटींचा गंडा घालणाऱ्या निर्यातदार कंपन्यांचा DGGI कडून पर्दाफाश
Posted On:
09 OCT 2020 2:55PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 9 ऑक्टोबर 2020
अस्तित्वात नसलेल्या किंवा संशयास्पद कंपन्याची बिले किंवा ज्या कंपन्यांनी मुळात खरेदीच केलेली नाही अश्या कंपन्यांची बिले सादर करून काही फसव्या निर्यातदार कंपन्या इनपूट टॅक्स क्रेडिट (ITC)चा फसवा लाभ मिळवित आहेत असे वस्तु आणि सेवा कर महानिदेशनालयाच्या (DGGI) अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले आहे. अश्या प्रकारे मिळविलेल्या इनपूट टॅक्स क्रेडिटचा उपयोग निर्यात केलेल्या सामानावरील IGST भरण्यासाठी केला जात असून त्यानंतर त्यावर सूटही मागितली जाते. ज्या मालासाठी कर भरणा केलेला नाही अश्या मालावर इनपूट टॅक्स क्रेडीटची सवलत घेणे आणि अश्या प्रकारे न भरलेल्या कराचा खोटा दाखला देऊन बनावट इनपूट टॅक्स क्रेडिटवर भरलेला IGSTचा नकद परतावा मागणे या प्रकारामुळे सरकारी तिजोरीला दुप्पट नुकसान होत आहे. अश्या प्रकारे परत केलेल्या IGSTची रक्कम साधारणतः 61 कोटींच्या घरात जाते.
वस्तु आणि सेवा कर महानिदेशनालयाच्या अधिकाऱ्यांनी अश्या निर्यातदार कंपन्यांचा शोध घेऊन त्यांच्या मालकांची निवासस्थाने तसेच पुरवठादार कंपन्यांच्या परिसरात 06/03/2020 ला शोध घेतला. या पुरवठादार कंपन्यांनी न पुरवलेल्या मालाची फक्त बिले निर्यातदारांना दिल्याचे निदर्शनास आले. निर्यातदारांनी ह्या खोट्या बिलांवर इनपूट टॅक्स क्रेडिट घेतले व या मालाची निर्यात केल्याचे दाखवून त्याचा परतावा मागितला. या निर्यातदार कंपन्यांच्या संचालकांना महानिदेशनालयाने (DGGI) 6/3/2020 रोजी ताब्यात घेतले. लुधियाना येथील एका पुरवठादार कंपनीचा मालक मात्र फरार झाला व त्याचा ठावठिकाणा कळला नाही. अनेक वेळा समन्स धाडूनही तो सुनावणीस उपस्थित राहिला नाही. या पुरवठादार कंपनीच्या मालकाचा अश्या प्रकारच्या अनेक आर्थिक घोटाळ्यात हात असल्याचे निदर्शनास आले असून तो तसेच त्याच्या कंपनीविरूद्ध अनेकदा आर्थिक फसवणूकीच्या तक्रारीही दाखल झाल्या आहेत. त्याला याआधी COFEPOSA खाली प्रतिबंधात्मक अटक झाली आहे.
हा गृहस्थ सिमला येथे असून एका प्रख्यात पंचतारांकित हॉटेलमध्ये राहत असल्याची खबर मिळाली. सिमला येथे शोध घेण्यासाठी नेमलेल्या अधिकाऱ्यांच्या एका पथकाने त्याला 07.10.2020 रोजी सिमला येथून ताब्यात घेतले. न्यायालयासमोर त्य़ाला सादर करून 14 दिवसांसाठी न्यायालयीन कोठडी देण्यात आली असून तिहार तुरुंगात त्याचा रवानगी केली आहे. या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे.
* * *
U.Ujgare/V.Sahajrao/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1663077)
Visitor Counter : 190