विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय

सीएसआयआर-आयएमएमटीचा आज 57 वा स्थापना दिन


डॉ. हर्ष वर्धन यांनी लोकांच्या जीवनात चांगले बदल घडवून आणण्यासाठी वैज्ञानिकांना नवीन कल्पना, पुनर्विचार, पुनर्र्चना आणि संशोधन करण्याचे आवाहन केले.

Posted On: 08 OCT 2020 8:29PM by PIB Mumbai

 

भुवनेश्वर येथील सीएसआयआर-आयएमएमटी (इन्स्टिट्यूट ऑफ मिनरल्स अँड मटेरियल्स टेक्नॉलॉजी) संस्थेने आज 57 वा स्थापना दिन आभासी कार्यक्रमाद्वारे साजरा केला.

केंद्रीय विज्ञानआणि तंत्रज्ञान, पृथ्वी विज्ञान आणि आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री डॉ हर्ष वर्धन हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. डॉ.शेखर सी. मांडे , सचिव डीएसआयआर आणि महासंचालक , सीएसआयआर सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित होते तर सीएसआयआर-आयएमएमटीचे संचालक प्रा एस बसू, स्थापना दिन समारंभ समितीचे अध्यक्ष डॉ. ए के साहू आणि इतर अनेक वैज्ञानिक, अधिकारी आणि कर्मचारी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे या कार्यक्रमात सहभागी झाले.

यावेळी डॉ.हर्ष वर्धन यांनी संस्थेचा वार्षिक अहवाल 2019-2020 (http://events.immt.res.in/relreport/) प्रसिद्ध केला. त्यांनी सीएसआयआर-आयएमएमटी व्हिडिओ (http://events.immt.res.in/relvideo/) आणि सीएसआयआर-आयएमएमटी थीम सॉन्ग (http://events.immt.res.in/relthemesong/) देखील प्रकशित केले. त्यांनी सीएसआयआर-आयएमएमटी संकेतस्थळ (http://events.immt.res.in/relwebsite/) आणि संस्थेच्या ई-प्रदर्शनाचे उद्घाटन (http://events.immt.res.in/relexication/) देखील केले.

आयएमएमटी ही नवी दिल्लीच्या वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेची (सीएसआयआर) एक प्रमुख राष्ट्रीय प्रयोगशाळा आहे. खनिज, साहित्य आणि भारताच्या इतर नैसर्गिक स्त्रोतांच्या क्षमतेचा वापर करण्यासाठी ही संस्था समर्पित आहे.भुवनेश्वर येथील प्रादेशिक संशोधन प्रयोगशाळेंचे (आरआरएल) 13 एप्रिल 2007 रोजी खनिज आणि सामुग्री तंत्रज्ञान संस्था (आयएमएमटी) असे नव्याने नामकरण करण्यात आले.

आयएमएमटीमध्ये संशोधन आणि विकासाचा मुख्य भर भारतीय उद्योगांना स्वदेशी नैसर्गिक संसाधनांच्या व्यावसायिक वापरासाठी प्रगत प्रक्रिया माहिती आणि सल्लामसलत सेवा प्रदान करुन स्वयंपूर्णतेच्या आव्हानांचा सामना करण्यासाठी सक्षम करणे आणि त्याचबरोबर विज्ञानातील उच्च क्षमतेचे मूलभूत संशोधन आणि अभियांत्रिकी वापर करण्यावर आहे.

डॉ. हर्ष वर्धन यांनी सीएसआयआर-आयएमएमटीला शुभेच्छा दिल्या आणि टाकाऊ कचऱ्याचे संपत्तीत रूपांतर करण्याच्या वैज्ञानिकांच्या प्रयत्नांचे कौतुक केले. ते म्हणाले की मानव जातीला भेडसावणाऱ्या प्रत्येक समस्येवर तोडगा काढण्याची विज्ञानात क्षमता आहे. परिस्थितीच्या मागणीनुसार भारतीय वैज्ञानिकांनी नेहमीच उत्तम कामगिरी केली आहे. असे ते म्हणाले. देशात विविध संस्थांमधील सर्व वैज्ञानिकांच्या महान योगदानाचे स्मरण करताना त्यांनी कोविड -19 विरूद्ध लढा देण्यासाठी वैज्ञानिकांना नवीन कल्पना, पुनर्र्चना आणि संशोधन करण्याचे आवाहन केले जेणेकरून च्या वादळांना नवीन जीवनदृष्टी, पुनर्विचार, पुनर्जागरण आणि संशोधन करून लोकांच्या जीवनात चांगले बदल घडवून आणण्यासाठी आवाहन केले.

डॉ.शेखर मांडे यांनी या वर्षाच्या सुरुवातीला अ‍ॅम्फन चक्रीवादळ दरम्यान लोकांच्या अडचणी दूर करण्यासाठी सीएसआयआर-आयएमएमटीने दिलेले योगदान अधोरेखित केले.

****

B.Gokhale/S.Kane/P.Kor

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1662868) Visitor Counter : 137