संरक्षण मंत्रालय
भारतीय हवाई दलाचे अत्याधुनिक कमी वजनाचे हेलिकॉप्टर खबरदारीचा उपाय म्हणून खाली उतरवले
Posted On:
08 OCT 2020 6:41PM by PIB Mumbai
भारतीय हवाई दलाचे अत्याधुनिक कमी वजनाच्या हेलिकॉप्टरने नियमित प्रशिक्षणाचा भाग म्हणून सरसावा इथल्या हवाई तळावरुन उड्डाण केले होते. सरसावा विमानतळावरुन सुमारे 30 नॉटीकल मैलावर उंच असतांना, हेलिकॉप्टर मध्ये तांत्रिक बिघाड आल्यामुळे वैमानिकाने खबरदारीचा उपाय म्हणून या विमानतळाच्या दक्षिणेला हेलिकॉप्टर सुरक्षितपणे खाली उतरवले. वैमानिकांनी समयसूचकता दाखवत योग्य निर्णय घेऊन हेलिकॉप्टर खाली आणले. या घटनेत मालमत्तेचे काहीही नुकसान झाल्याचे वृत्त नाही. सरसावाच्या हवाई तळावरुन त्वरित एक बचाव पथक घटनास्थळी पाठवण्यात आले.
****
B.Gokhale/R.Aghor/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1662802)
Visitor Counter : 169