विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय
सरकारचे वैज्ञानिक माहिती सामायिक करण्यावर अधिक लक्ष: प्रो.आशुतोष शर्मा, डिएसटी सचिव यांचे विज्ञान, तंत्रज्ञान आणि समाज या विषयावरील परिषदेत प्रतिपादन
कोरोना विषाणू वरील लस संशोधन चाचणीचे कार्य प्रगतीपथावर आणि अर्ध्या जगाला लस पुरवण्याची भारताकडे क्षमता-आशुतोष शर्मा
Posted On:
04 OCT 2020 9:45PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 4 ऑक्टोबर 2020
भारत वैज्ञानिक माहिती सामायिक करण्यावर अधिकाधिक लक्ष देत असून हे भारताच्या नॅशनल डेटा शेअरींग अँड अॅक्सेसिबिलीटी पोर्टलवरुन स्पष्ट झाले आहे, असे प्रतिपादन विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाचे सचिव प्रो.आशुतोष शर्मा यांनी केले. ते विज्ञान, तंत्रज्ञान आणि समाज याविषयीच्या 17 व्या वार्षिक बैठकीत बोलत होते.
आंतरराष्ट्रीय संशोधन आणि विकास यामधील सहयोग, सामाजिक विज्ञान आणि खुले विज्ञान या विषयांवर, दिनांक 3 ऑक्टोबर 2020 रोजी विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाने आयोजित केलेल्या आणि जपानने यजमानपद भूषवलेल्या ऑनलाईन बैठकीत विचार विनिमय करण्यात आला. या बैठकीला सुमारे 50 देशांतील विज्ञान आणि तंत्रज्ञान विषयांचे प्रमुख सहभागी झाले होते आणि कोविड-19 मुळे निर्माण झालेल्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय सहयोग या विषयातील संधी शोधण्यावर या बैठकीत चर्चा करण्यात आली.
या मंत्रिस्तरीय परिषदेत विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाचे सचिव प्रो. आशुतोष शर्मा भारताचे प्रतिनिधी म्हणून उपस्थित होते आणि भारताचे विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय सहकार्य ,सामाजिक विज्ञान आणि खुले विज्ञान यातील उपक्रमांवर त्यांनी अधिक भर दिला. ते म्हणाले ,की भारताने विज्ञान आणि तंत्रज्ञान या विषयांतील संशोधन आणि विकासाच्या आंतरराष्ट्रीय सहयोगाला अधिक महत्त्व दिले आहे आणि आरोग्य क्षेत्रातील आव्हाने जल, ऊर्जा, पर्यावरण, हवामान बदल, संप्रेषण आणि नैसर्गिक आपत्ती या विषयांवरील आव्हानांनादेखील अधिक महत्त्व दिले आहे.
त्यांनी भारताच्या 40 पेक्षा अधिक देशांसोबतच्या आंतरराष्ट्रीय सहयोगाविषयी यावेळी माहिती दिली.
प्रा. आशुतोष शर्मा यांनी हे स्पष्ट केले की कोरोना विषाणूची लस चाचणीच्या टप्प्यात आहे आणि जगाच्या मोठ्या भागाला ही लस पुरविण्याची भारतामध्ये क्षमता आहे.
या मंत्रीगटाच्या बैठकीला अर्जेंटीना, ऑस्ट्रेलिया, ब्राझील, इंडोनेशिया, भारत, इराक, रशिया, दक्षिण आफ्रिका आणि इतर विविध देशांतील सदस्य सहभागी झाले होते.
* * *
S.Thakur/S.Patgaonkar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1661642)
Visitor Counter : 243