भूविज्ञान मंत्रालय
उत्तर अंदमान समुद्र आणि नजीकच्या पूर्व मध्य बंगालच्या उपसागरात 9 ऑक्टोबर दरम्यान कमी दाबाचा पट्टा निर्माण होण्याची शक्यता
प्रविष्टि तिथि:
04 OCT 2020 5:52PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 4 ऑक्टोबर 2020
भारतीय हवामानखात्याच्या चक्रीवादळ इशारा विभागाने दिलेल्या इशारानुसार अंदमान समुद्रावर 9 ऑक्टोबर दरम्यान कमी दाबाचा पट्टा निर्माण होण्याची शक्यता आहे आणि दोन दिवसांत तो उत्तर आंध्र प्रदेश आणि ओदिशा किनाऱ्याकडे सरकण्याची शक्यता आहे.
सध्या बंगालच्या उपसागराच्या उत्तर-पश्मिचेला कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. हा कमी दाबाचा पट्टा 5 ऑक्टोबरपर्यंत कायम राहून हळूहळू कमी तीव्रतेचा होत जाईल. तथापी, चक्रीवादळ 6 ऑक्टोबरपर्यंत छत्तीसगढकडे सरकत जाईल आणि 7 ऑक्टोबरपर्यंत कायम राहिल.
अंदमान आणि निकोबार बेटांवर 9 आणि 10 ऑक्टोबर मुसळधार (6.5-12 सेंमी) ते अतिवृष्टी (12-20 सेंमी) होऊ शकते.
तसेच सध्या वायव्य बंगाल आणि ओदिशा किनाऱ्यावर निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे ओदिशा, बिहार, झारखंड, पश्चिम बंगालमध्ये पुढील चार दिवसात पाऊस अनुमानित आहे.
मोसम अॅप डाऊनलोड करा आणि हवामान अंदाजाविषयी माहिती मिळवा, मेघदूत अॅपच्या माध्यमातून कृषीविषयक माहिती आणि दामिनी अॅपच्या माध्यमातून विजांविषयी माहिती मिळवा.
* * *
B.Gokhale/S.Thakur/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1661589)
आगंतुक पटल : 145