उपराष्ट्रपती कार्यालय

जगासमोर असलेल्या सामाजिक, राजकीय, आर्थिक आणि पर्यावरणीय समस्या सोडवण्यासाठी महात्मा गांधी यांचे तत्वज्ञान पुनरुज्जीवित करण्याची गरज- उपराष्ट्रपती


आज जगाला एका स्नेहमय स्पर्धेची गरज असून, गांधीजींच्या आदर्शातून तो मिळू शकेल-उपराष्ट्रपती

शाश्वत विकासाच्या दृष्टीकोनाची गरज- उपराष्ट्रपती

‘गांधी आणि जग’ या आंतरराष्ट्रीय वेबिनारच्या सांगता समारंभात ‘पूर्व ध्वनीमुद्रित व्हिडीओ च्या माध्यमातून उपराष्ट्रपतींनी साधला संवाद

Posted On: 02 OCT 2020 9:07PM by PIB Mumbai

 

आज सातत्याने जगाला भेडसावत असलेल्या सामाजिक, राजकीय, आर्थिक आणि पर्यावरणीय समस्यांचा सामना करण्यासाठी आज महात्मा गांधी यांचे तत्वज्ञान  पुनरुज्जीवित करण्याची गरज आहे, असं मत, उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांनी व्यक्त केले. जगाला आज एक स्नेहमय स्पर्शाची गरज असून गांधीजींच्या आदर्शांमध्ये ती ताकद असल्याचे उपराष्ट्रपती म्हणाले.

जागतिक व्यवहार विषयक भारतीय परिषदेने आयोजित केलेल्या गांधी आणि जगया विषयावरील दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय वेबिनारमध्ये ते पूर्व ध्वनीमुद्रित व्हिडीओच्या माध्यमातून सहभागी झाले होते.

महात्मा गांधी यांची मूल्ये कालातीत आणि आजही प्रासंगिक असल्याचे सांगत ते म्हणाले, की आज जग जेव्हा नवनव्या आव्हानांचा सामना करत आहे, अशावेळी ही मूल्ये अधिकच आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

सध्याच्या कोविड काळाविषयी बोलतांना ते म्हणाले की 1918 मधेही स्पेनिश फ्लू ची साथ आली होती, त्यावेळी गांधीजीनी, संकटकाळात सर्व लोकांच्या विशेषतः गरीब आणि वंचितांच्या वेदना समजून घ्यायला हव्यात असे मत व्यक्त केले होते, याची आठवण त्यांनी केली.

गरिबांविषयी केवळ सहानुभूती नाही तर सहवेदना असायला हवी, असं सांगत, आज गरजू आणि गरिबांना सर्वांनी शक्य तो मदतीचा हात द्यावा, असे आवाहन नायडू यांनी केले.

जागतिक आरोग्यविषयक आव्हानांचा सामना करतांना स्वतःचे संरक्षण कसे करावे, याचा सल्लाही गांधीजीनी दिला होता, त्याकडे त्यांनी लक्ष वेधले.

महात्मा गांधी यांची जयंती संयुक्त राष्ट्रांद्वारे, ‘आंतरराष्ट्रीय अहिंसा दिनम्हणून पाळली जाते.समृद्धीसाठी शांतता ही पूर्वअट आहे, असे नायडू म्हणाले. महात्मा गांधीनी आपल्या सत्य आणि अहिंसेच्या संदेशातून जगाला अन्यायाविरुध्द लढण्याचा एक अभिनव मार्ग शिकवला,” असे नायडू म्हणाले.

या वेबिनारमध्ये भारतासह जगातल्या 14 देशांचे अभ्यासक सहभागी झाल्याविषयी आनंद व्यक्त करत ते म्हणाले, की यातूनच गांधीजींची मूल्ये, संदेश आणि शिकवण याचे महत्व अधोरेखित होते.

सत्याग्रह आणि अहिंसा हे गांधींच्या तत्वज्ञानाचे मुख्य आधारस्तंभ असून, हे विचार, 20 व्या शतकात आणि आजही जगाला दीपस्तंभाप्रमाणे मार्गदर्शक ठरले आहेत. 

महात्मा गांधी यांचा मानवतेवर गाढ विश्वास होता, व्यक्ती चुकीची नसते, तिची कृती चुकीची असू शकते, असे त्यांचे तत्वज्ञान होते. सत्य, अहिंसा आणि शांतता हे त्यांचे तत्वज्ञान आज कदाचित सर्वाधिक गरजेचे आणि प्रासंगिक आहे, असे उपराष्ट्रपती म्हणाले.

वसुंधरेकडे सर्वांच्या गरजा भागवण्याइतकी पुरेशी साधनसंपत्ती आहे, मात्र, लाभ पूर्ण करण्याइतकी नाही.हे गांधीजींचे वचन उद्धृत करत ते म्हणाले, की आज जेव्हा पर्यावरणाचा झपाट्याने ऱ्हास होतो आहे, तेव्हा आपण शाश्वत विकासाच्या संतुलित गरजांकडे जाणे अत्यंत आवश्यक आहे,

या कार्यक्रमात विविध देशांमधले अभ्यासक सहभागी झाले होते.

****

B.Gokhale/R.Aghor/P.Kor

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1661147) Visitor Counter : 235