आयुष मंत्रालय
आयुष मंत्री उद्या पुण्यात आदिवासी आरोग्य सेवेसाठी निसर्गोपचार प्रकल्पाचे उद्घाटन करणार
प्रविष्टि तिथि:
01 OCT 2020 7:20PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 1 ऑक्टोबर 2020
गांधी जयंतीनिमित्त, आयुष राज्यमंत्री (स्वतंत्र कार्यभार) श्रीपाद येसो नाईक उद्या व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे पुणे येथील गोहेबुद्रुक येथील आदिवासी पाड्यात निसर्गोपचार रुग्णालयाचे उद्घाटन करणार आहेत. हा प्रकल्प या परिसरातील आदिवासी रूग्णांसाठी निसर्गोपचार आणि योग उपचार केंद्र म्हणून तसेच आदिवासी तरूणांना त्यांच्या आरोग्य पद्धतींमध्ये निसर्गोपचार आणि योग कौशल्ये समाविष्ट करणारे प्रशिक्षण केंद्र म्हणून काम करेल. हे केंद्र आदिवासींच्या आरोग्य पद्धतींचा अभ्यास करेल आणि आदिवासींच्या आरोग्य पद्धतींचा संग्रह विकसित करेल. महाराष्ट्राचे आदिवासी कल्याण मंत्री के.सी. पाडवी या कार्यक्रमात सहभागी होतील.
एनआयएन चे संचालक आणि एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, गोडेगाव, पुणे चे प्रकल्प अधिकारी, यांच्यात झालेल्या करारानुसार ही आरोग्य सुविधा असून योग आणि निसर्गोपचार रुग्णालयाच्या स्थापनेसाठी आदिवासी शाळेची (आश्रम) ची जागा दिली आहे. या प्रकल्पात प्रतिकार क्षमता वाढवण्यासाठी निसर्गोपचार आणि योग उपचारांचा वापर करण्याचा विशेष आदेश आहे. हे निसर्गोपचार आणि योग कम प्रशिक्षण केंद्र देशातील उर्वरित राज्यांसाठी मॉडेल युनिट म्हणून काम करणे अपेक्षित आहे.
गोहेबुद्रुक नेचरोपॅथी रुग्णालयात 20 खाटांची क्षमता असून महिला आणि पुरुषांसाठी स्वतंत्र वॉर्ड, सुसज्ज योग सभागृह , आहार केंद्र व नैसर्गिक उपचारांचा समावेश आहे.
हे केंद्र प्रामुख्याने स्थानिक उपलब्ध स्त्रोतांद्वारे स्थानिक लोकांच्या पौष्टिक गरजांवर लक्ष केंद्रित करेल आणि नैसर्गिक उपचारांचा वापर करुन प्रतिकारक्षमता वाढवणारी आरोग्य सेवा देईल. आरोग्य सेवा केंद्र म्हणून काम करण्याबरोबरच तरूण आदिवासी पुरुष आणि महिलांना साध्या निसर्गोपचार उपचाराचे प्रशिक्षण दिले जाईल ज्यामुळे संपूर्ण समुदायाला दीर्घकाळ फायदा होईल. तसेच याद्वारे त्यांना स्वयं -रोजगार म्हणून तसेच निसर्गोपचार आणि योग केंद्र तसेच निरामय आरोग्य आणि स्पा उद्योगात रोजगार मिळवून देण्यास सक्षम बनवू शकेल.
* * *
B.Gokhale/S.Kane/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1660754)
आगंतुक पटल : 158