संरक्षण मंत्रालय

हेडक्वार्टर्स इन्टीग्रेटेड डिफेन्स स्टाफचा 20 वा स्थापना दिन साजरा

Posted On: 01 OCT 2020 6:40PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 1 ऑक्‍टोबर 2020


एकीकृत डिफेन्स स्टाफचा आज 01 ऑक्टोबर रोजी 20 वा स्थापना दिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपीन रावत यांनी तिन्ही सैन्यदलांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना शुभेच्छा दिल्या.  

हेडक्वार्टर्स एकीकृत डिफेन्स स्टाफ, जो एचक्यु आयडीएस नावाने ओळखला जातो, याची स्थापना 01 ऑक्टोबर 2001 रोजी करण्यात आली. सशस्त्र सेनांदलांमध्ये संयुक्ततेस प्रोत्साहन देण्यासाठी आणि संरक्षण मंत्रालय आणि इतर विभाग आणि मंत्रालयांमध्ये चांगला समन्वय सुनिश्चित करण्याच्या उद्देशाने या विभागाची स्थापना करण्यात आली. एचक्यु आयडीएसने गेल्या 19  वर्षांत सुरक्षा, आधुनिकीकरण, समन्वय आणि सैन्य मुत्सद्दीपणा यासारख्या महत्त्वाच्या क्षेत्रात राष्ट्रीय प्रयत्नांना प्रोत्साहन देण्यासाठी सैन्यदलांना सहकार्य केले. गेल्या वर्षी सैन्य व्यवहार विभाग (डीएमए) आणि चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (सीडीएस) ची निर्मिती करणे हे महत्त्वाचे टप्पे आहेत, ज्यामुळे सशस्त्र सैन्याच्या परिवर्तनास आणि उच्च संरक्षणात एकत्रिकरणास आवश्यक प्रेरणा मिळाली आहे.

एचक्यु आयडीएस तिन्ही सेवांमध्ये एकीकरण आणि समन्वय साधण्याच्या उद्देशाने उपक्रमांसह आघाडीवर आहे आणि “संयुक्ततेच्या माध्यमातून विजय” या बोधवाक्याला साजेशी कामगिरी करत आहे

 

* * *

B.Gokhale/S.Thakur/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1660730) अभ्यागत कक्ष : 129