रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय

राष्ट्रीय महामार्ग क्षेत्रामध्ये उद्योग सुलभतेमध्ये सुधारणा करण्यासाठी ‘एनएचएआय'र्तफे उद्योग मंडळांकडून आलेल्या शिफारसींना सहमती

Posted On: 29 SEP 2020 8:13PM by PIB Mumbai

 

राष्ट्रीय महामार्ग क्षेत्रामध्ये व्यवसायाच्या सुलभतेमध्ये आणखी सुधारणा करण्यासाठी एनएचएआय म्हणजे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने सीईएआयया अभियांत्रिकी उद्योग संस्थेकडून आलेल्या बहुतांश शिफारसी, सूचनांना सहमती दर्शवली आहे.

एनएचएआयने दिलेल्या माहितीनुसार सीईएआयने ओम्नीबस बँक हमी, सल्लागारांच्या कार्याचे मापदंड,   डीपीआरला मान्यता, मूल्य अभियांत्रिकी? तांत्रिक क्षमतांची तरतुद, लिलावांचे मूल्यांकन आदि विषयांवर काही सूचना, शिफारसी केल्या होत्या. यापैकी बहुतांश शिफारसींना एनएचएआयने सहमती दर्शविली आहे. तसेच ज्या सूचना एनएचएआयच्या कार्यक्षेत्रामध्ये येत नाहीत, त्या सूचना संबंधित अधिका-यांकडे विचारार्थ पाठविल्या आहेत. उद्योग-व्यवसायाच्या सुलभतेसाठी चांगल्या सूचना आणि शिफारसी केल्या जात असतील तर त्यांचा भविष्यातही एनएचएआयच्यावतीने जरूर सकारात्मक विचार केला जाईल, असे एनएचएआयने स्पष्ट केले आहे.

 

एनएचएआयने स्वीकृत केलेल्या काही प्रमुख सूचना -

1.    एनएचएआयने ओम्नीबस बँक हमी प्रणाली स्वीकारली असून त्यासंदर्भातील मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत.

2.    नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान तसेच साहित्य-सामुग्रीचा वापर करण्याची सूचना मान्य केली असून सल्लागारांना डीपीआर तयार करताना अशा नवीन तंत्रज्ञानाचा प्रस्ताव देण्यास सूचविले आहे. तसेच विनाकारण खर्च होवू नये, याची काळजी घेतली जाणार आहे. डीपीआरच्या विविध टप्प्यांची मान्यतेची प्रक्रिया जलदतेने राबविण्यात येणार आहे.

3.    सल्लागारांना नियोजित वेळेवर त्यांचे पैसे मिळण्यासाठी एनएचएआय वचनबद्ध  आहे.

4.    तांत्रिक क्षमता तरतुदीनुसार सल्लागारांना त्यांच्या कार्यानुसार आणि विक्रेता कामगिरी मूल्यांकन प्रणालीनुसार दर्जा देण्यात येणार आहेे.

उद्योग व्यवसायाच्या सुलभीकरणासाठी आणि भागीधारकांशी चांगले संबंध राहण्यासाठी एनएचएआयने अधिक सुविधा पुरवण्याचे मान्य केले आहे.

-----

B.Gokhale/S.Bedekar/P.Kor

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1660141) Visitor Counter : 152