कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन मंत्रालय
केंद्रीय मंत्री डॉ जितेंद्र सिंह यांच्यामार्फत बीव्हीपी कडून पीएम केअर्स फंडसाठी 2.11कोटी रूपयांचे योगदान
Posted On:
28 SEP 2020 9:58PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 28 सप्टेंबर 2020
भारत विकास परिषद, (बीव्हीपी) या सामाजिक संस्थेकडून पंतप्रधान कार्यालय राज्यमंत्री डॉ जितेंद्र सिंह यांच्यामार्फत पीएम केअर्स फंडसाठी 2.11 कोटी रूपयांचे योगदान देण्यात आले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याप्रती जनतेला प्रचंड विश्वास आहे म्हणूनच त्यांनी एखाद्या गोष्टीसाठी आवाहन करताच त्याला उत्स्फूर्तपणे व्यापक चळवळीचे स्वरूप लाभते. स्वच्छ भारत अभियान, स्वच्छतागृहे बांधणे, स्वयंपाकाच्या गॅससाठीच्या अनुदानाचा स्वेच्छेने त्याग असो किंवा टाळेबंदी आणि कोविड महामारीसंदर्भातल्या मार्गदर्शक तत्वांचे पालन असो, यावेळी आपल्याला याची प्रचीती आल्याचे जितेंद्र सिंह म्हणाले.

सुमारे सहा दशके निष्ठेने सेवा कार्य करणाऱ्या भारत विकास परिषद या सामाजिक संस्थेची त्यांनी प्रशंसा केली. पूर, दुष्काळ, यासह कोणत्याही आपत्तीच्या वेळी भारत विकास परिषद समाजाच्या सेवेसाठी अग्रेसर असते असे प्रशंसोद्गार त्यांनी काढले.
S.Thakur/N.Chitale/ P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1659916)