संरक्षण मंत्रालय

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आयएमए डेहराडून संकुलांना जोडणाऱ्या भुयारी मार्गाच्या बांधकामासाठी पायाभरणी केली

Posted On: 28 SEP 2020 9:27PM by PIB Mumbai

नवी दिल्ली,  28 सप्टेंबर  2020

 

संरक्षण मंत्री  राजनाथ सिंह यांनी  आज नवी दिल्लीत  व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे डेहराडूनच्या  भारतीय सैन्य अकादमी येथे  भुयारी मार्गाच्या बांधकामाची  पायाभरणी केली.

या समारंभाला  संबोधित करताना संरक्षण मंत्री म्हणाले की या भुयारी मार्गांच्या बांधकामाला हिरवा कंदील  मिळण्यास 40 वर्षे लागली. या भुयारी मार्गांमुळे अकादमीच्या तीन संकुलांमध्ये येणे-जाणे सुलभ  होईल. आतापर्यंत, प्रशिक्षणार्थी कॅडेट्सना  एका बाजूकडून दुसर्‍या बाजूने जाण्यासाठी रहदारी सिग्नलचा अडथळा  होता. तसेच आयएमए कॅडेट्सच्या हालचाली दरम्यान स्थानिक लोकांसाठी देखील ही समस्या आहे. उत्तराखंडची राजधानी डेहराडूनची लोकसंख्या वाढत असल्यामुळे  वाहतुकीत मोठी  वाढ झाली असून त्यामुळे वारंवार वाहतुकीची कोंडी होते. भुयारी मार्गांच्या बांधकामामुळे एनएच 72 वर वाहतुकीचा ओघ सुलभ  होईल. या भुयारी मार्गांमुळे देहरादूनच्या लोकांबरोबरच उत्तराखंड, पंजाब, हिमाचल प्रदेश आणि हरियाणामधील  लोकांनाही मोठा फायदा होईल.

भुयारी मार्गाचा प्रस्ताव ऑक्टोबर 1978 मध्ये जनरल कॅडेट्सची सुरक्षा आणि डेहराडूनमधील लोकांची  सोय लक्षात घेऊन तयार करण्यात आला होता. मात्र  मालकी हक्क  आणि निधीच्या विविध समस्यांमुळे प्रकल्पाचे काम सुरू होऊ शकले नाही. 7 डिसेंबर, 2019 रोजी AT-2019 च्या पासिंग आऊट परेड दरम्यान संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी भुयारी मार्गाच्या बांधकामासाठी  45 कोटी रुपये  किमतीच्या आवश्यक खर्चाला मान्यता (एओएन) जाहीर केली होती.

 

M.Chopade/S.Kane/ P.Malandkar

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1659888) Visitor Counter : 124