वस्त्रोद्योग मंत्रालय
देशात यंत्रमाग क्षेत्राचा विकास
Posted On:
22 SEP 2020 7:25PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 22 सप्टेंबर 2020
यंत्रमाग आणि संबंधित उत्पादने तसेच सेवा यासाठी सरकार भांडवल निधी योजना राबवीत आहे. पॉवर टेक्स्ट इंडिया योजनेचा भाग म्हणून ती 14:04:2017 पासून लागू आहे. वस्त्रोद्योग निधी (TEX- फंड) कडे किमान 35 कोटी एवढा निधी आहे. तर भारत सरकारचे 24.50 कोटी आणि लघु उद्योग विकास भारतीय बँक (SIDBI) यांचे 10.50 कोटींचे योगदान आहे. सिडबी (SIDBI) साहसी निधी मर्यादित ही टेक्स्टाईल निधीचे व्यवस्थापन करते.
यंत्रमाग क्षेत्रातील लघु आणि मध्यम उद्योगांसाठी समभाग गुंतवणुक पुरवठा करणे हे टेक्ट निधीचे उद्दिष्ट आहे. यासाठी ब्रँड तयार करणे तसेच बौद्धिक हक्क संपदा याद्वारे नवीन कल्पनांना प्रोत्साहन आणि यंत्रमाग क्षेत्रातील संबंधित व्यवसायांच्या विकास यासाठी त्याचा उपयोग केला जातो. पॉवर टेक्स्ट इंडियाच्या या योजनांचा लाभ घेण्यासाठी टोल फ्री हेल्पलाईन 1800 22 2017 जारी केली आहे . त्याद्वारे या योजनेतील लाभ घेता येतील. iPowerTex हे मोबाईल ॲप ही गूगल प्ले स्टोर वरून डाऊनलोड करून घेता येईल
केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री स्मृती झुबिन इराणी यांनी आज राज्यसभेत एका लेखी उत्तरात ही माहिती दिली.
* * *
M.Iyengar/V.Sahajrao/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1657881)