कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन मंत्रालय
नवीन मुख्य माहिती आयुक्त आणि माहिती आयुक्तांच्या नियुक्तीची प्रक्रिया सुरू: डॉ. जितेंद्र सिंह
Posted On:
22 SEP 2020 6:50PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 22 सप्टेंबर 2020
नवीन मुख्य माहिती आयुक्त आणि माहिती आयुक्तांच्या नियुक्तीची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती केंद्रीय राज्यमंत्री (स्वतंत्र कार्यभार), पूर्वोत्तर प्रदेश विकास, पंतप्रधान कार्यालय राज्यमंत्री, कार्मिक, सार्वजनिक तक्रार निवारण आणि निवृत्तीवेतन, अणुऊर्जा आणि अंतराळ मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी आज राज्यसभेमध्ये एका लेखी उत्तरामध्ये दिली.
केंद्रीय माहिती आयोगाच्या मुख्य माहिती आयुक्तांचा कार्यकाळ दि. 26.08.2020 रोजी पूर्ण झाला आहे. तसेच एका माहिती आयुक्तांचा कार्यकाळ दि. 25.09.2020 रोजी पूर्ण होत आहे. त्यामुळे या रिक्त पदांवर वेळेवर नियुक्ती करण्यासाठी प्रसार माध्यमातून दि. 09.07.2020 रोजी जाहिरात देण्यात आली असून ही प्रक्रिया सरकारने सुरू केली आहे. यानुसार एक मुख्य माहिती आयुक्त आणि सहा माहिती आयुक्तांची नियुक्ती करण्यात येणार आहे.
ही नियुक्तीची प्रक्रिया उच्च स्तरीय समितीमार्फत नियमित कार्यपद्धतीनुसार पूर्ण करण्यात येत आहे. त्यासंदर्भात अर्जांची छाननी करून उमेदवारांची लघुसूची तयार करण्यात येत आहे, असे यावेळी सभागृहामध्ये सांगण्यात आले.
* * *
B.Gokhale/S.Bedekar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1657844)