संरक्षण मंत्रालय
बुलेटप्रूफ जाकिटे
Posted On:
21 SEP 2020 6:47PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 21 सप्टेंबर 2020
सशस्त्र कारवाई करण्यासाठी सर्व सैनिकांना त्यांच्या कामाच्या आवश्यकतेनुसार बुलेटप्रूफ जाकिटे (बीपीजे) आणि बॅलिस्टिक हेल्मेट यांचा पुरवठा केला जातो. एप्रिल, 2018 मध्ये केलेल्या एका करारानुसार 1,86,138 बुलेटप्रूफ जाकिटे आणि डिसेंबर, 2016 मध्ये केलेल्या करारानुसार 1,58,279 बॅलिस्टिक हेल्मेट यांची खरेदी करण्यात आली आहे. बॅलिस्टिक हेल्मेटमध्ये एकमेकांशी संवाद साधण्यासाठी बसविण्यात आलेले एक साधन असते, त्याच्यासह या हेल्मेटची खरेदी करण्यात आली आहे.
सर्वसाधारणपणे सर्व सशस्त्र जवानांच्या गुणवत्तेच्या आवश्यकतेनुसार आणि सशस्त्र दलाच्या कामाच्या गरजेनुसार बुलेटप्रूफ जाकिटे खरेदी करण्यात येतात.
नेमकी कशामुळे दुघर्टना झाली, याचे कारण प्रत्येकवेळी स्पष्ट होत नाही, मात्र सैनिकांना बुलेटप्रूफ जाकिटांची आवश्यकता असते.
अशी माहिती संरक्षण राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी आज लोकसभेमध्ये षण्मुग सुंदरम के यांनी विचारलेल्या एका प्रश्नाच्या लेखी उत्तरामध्ये दिली.
M.Iyengar/S.Bedekar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1657415)
Visitor Counter : 116