संरक्षण मंत्रालय

थेट परदेशी गुंतवणुकीच्या मार्गाने संरक्षण क्षेत्रात गुंतवणूक

Posted On: 19 SEP 2020 7:10PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 19 सप्‍टेंबर 2020

 

मे 2001,मध्ये संरक्षण उद्योग क्षेत्रात, जे आजवर केवळ सार्वजनिक क्षेत्र म्हणून राखीव होते, त्यात, 26 टक्के थेट परदेशी गुंतवणुकीसह भारतीय क्षेत्राच्या 100 टक्के सहभागाला परवानगी देण्यात आली.मात्र, त्यासाठी परवान्याची पूर्वअट असणार आहे. त्याशिवाय,केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या अखत्यारीतील, उद्योग आणि अंतर्गत व्यापार विभाग, यांनी प्रसिद्धीपत्रक क्र-5 (2016 मालिका)  द्वारे, 49 टक्के थेट परदेशी गुंतवणूक थेट मार्गाने तर 49 टक्क्यांच्या वरची गुंतवणूक केंद्र सरकारच्या माध्यमातून करण्यास परवानगी दिली आहे. विशेषत: जिथे आधुनिक तंत्रज्ञान किंवा इतर कारणांसाठी सरकारकडे नोंद करणे आवश्यक असेल.त्यापुढे, उद्योग क्षेत्रात, थेट परदेशी गुंतवणूक करण्यासाठी, उद्योग(विकास आणि नियमन)कायदा 1951 अंतर्गत, तसेच, लष्करी कायदा 1959  अंतर्गत, औद्योगिक परवान्याची गरज आहे. संरक्षण आणि अवकाश क्षेत्रातील 37 कंपन्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आतापर्यंत, संरक्षण आणि अवकाश क्षेत्रात थेट मार्गाने, 2883 कोटी रुपयांची थेट परदेशी गुंतवणूक झाली आहे. तसेच, 2014 पासून थेट मार्गाने संरक्षण आणि अवकाश क्षेत्रात एकूण 1849 कोटींपेक्षा अधिक रुपयांची गुंतवणूक झाली आहे.

संरक्षण राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी आज डॉ संबित पात्रा यांनी राज्यसभेत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ही माहिती दिली


* * *

B.Gokhale/R.Aghor/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1656725)