आयुष मंत्रालय

COVID-19 वर आयुर्वेदिक औषधे आणि त्यासंबंधीची नियमावली

Posted On: 18 SEP 2020 10:35PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 18 सप्‍टेंबर 2020

 

सार्स, cov-2 तसेच covid-19 संसर्गावर  रूढ पद्धती बाहेरील सुधारित संशोधनाच्या (extra mural researchb- EMR) योजने अंतर्गत आयुर्वेदिक औषधांचा वापर करण्यासाठी  एकूण 247 प्रस्ताव प्राप्त झाले . 

सार्स कोविड गटासाठी असलेल्या सक्षम आयुर्वेदिक तज्ञांकडून यापैकी 21 संशोधन प्रकल्प निधीसाठी प्रस्तावित केले आहेत. आयुष मंत्रालयाकडून आंतरशाखीय संशोधन आणि विकास कार्यक्रमासाठी तसेच covid-19  बाधितांवर   उपचारासाठी त्यांचा योग्य  वापर, उपयोग यांचा सखोल आढावा तसेच त्यांच्या एकत्रित वापरासाठी  त्या विषयातील तज्ञांशी विचार-विनिमय यासाठी  एक कार्यकारी समिती स्थापन करण्यात आली होती. या कार्यकारी समितीने  चार औषधी वनस्पतींची त्यांच्या रोगप्रतिकारक गुणधर्मावरिल   वैद्यकीय संशोधनासाठी निवड करून त्या संशोधनासाठी मार्गदर्शक नियमावली तयार केली. अश्वगंधा , जेष्ठमध, गुडूची+ पिंपळी आणि काही वनस्पतींचा एकत्रित वापर (आयुष-64)   या दिशेने हे संशोधन होत आहे.  आयुष संजीवनी या आयुष मंत्रालयातर्फे विकसित मोबाईल ॲप मधूनही काही माहिती एकत्रित झाली. आयुष मंत्रालयाने जारी केलेल्या या मोबाईल ॲप द्वारे आयुषच्या  सूचनांचा उपयोग करणाऱ्यांची संख्या , त्यांचा योग्य परिणाम आणि covid-19 प्रतिबंधासाठी त्याचा संभाव्य वापर यावर पाच दशलक्ष लोकांमधून माहिती गोळा करण्यात येत आहे . ही सर्व संशोधने सध्या वेगवेगळ्या टप्प्यात आहेत. 

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री  हर्षवर्धन यांनी आज लोकसभेत एका लेखी प्रश्नाच्या उत्तरात ही माहिती दिली. 


* * *

R.Tidke/V.Sahajrao/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1656593) Visitor Counter : 204