रसायन आणि खते मंत्रालय

वैधानिक अधिसूचित कमाल किरकोळ किंमतीत (एमआरपी) शेतकऱ्यांना युरिया पुरवले जात आहे: गौडा


देशात युरियाची कमतरता नाही : गौडा

Posted On: 18 SEP 2020 6:40PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 18 सप्‍टेंबर 2020

 

रसायने आणि खते मंत्री  डी.व्ही. सदानंद गौडा यांनी आज राज्यसभेत सांगितले कि केंद्र सरकारने अत्यावश्यक वस्तू कायदा , 1955  (ईसीए) आणि अधिसूचित खत (नियंत्रण) आदेश (एफसीओ) 1985 आणि खत  (हालचाली नियंत्रण) आदेश , 1973 अंतर्गत खत हे अत्यावश्यक  वस्तू म्हणून अधिसूचित केले आहे.  ते म्हणाले की, राज्य सरकारांना अधिसूचित एमआरपी दराने  खतांची विक्री करण्याबरोबरच खतांचा काळाबाजार रोखण्यासाठी पुरेसे अधिकार देण्यात आले आहेत. राज्य सरकारांना एफसीओ, 1985 आणि अत्यावश्यक वस्तू कायदा 1955 च्या तरतुदींचे उल्लंघन करणार्‍या कोणत्याही व्यक्तीविरूद्ध शोध घेण्याचे , जप्ती करण्याचे आणि दंडात्मक कारवाई करण्याचे अधिकार देखील देण्यात आले आहेते पुढे म्हणाले की, वैधानिक अधिसूचित कमाल किरकोळ किंमत (एमआरपी) दराने शेतकऱ्यांना युरिया देण्यात येत आहे. यूरियाच्या 45 किलो बॅगची एमआरपी प्रति बॅग 242 रुपये आहे (कडुनिंबाचे आच्छादन  आणि लागू  कर वगळता) आणि युरियाच्या 50  किलो बॅगची एमआरपी प्रति बॅग 268 रुपये (कडुनिंबाचे आच्छादन  आणि लागू  कर वगळता) आहे. त्या अनुषंगाने सर्व शेतकर्यांना अनुदानित दराने युरियाचा पुरवठा केला जात आहे.

बाजारपेठेतून जास्त किंमतीत शेतकऱ्यांनी युरिया खरेदी केल्याबद्दल कोणत्याही राज्य सरकारकडून खत-विभागाकडे माहिती आलेली नाही असे त्यांनी सभागृहाला सांगितले. 

देशात युरियाची कमतरता नाही असेही गौडा यांनी  सांगितले.


* * *

B.Gokhale/S.Kane/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1656363) अभ्यागत कक्ष : 132