शिक्षण मंत्रालय
भारतीय शिक्षण संस्थांचे जागतिक क्रमवारीतील स्थान सुधारण्यासाठी सरकारने विविध उपक्रम हाती घेतले आहेत - शिक्षणमंत्री
Posted On:
17 SEP 2020 9:20PM by PIB Mumbai
उच्च शैक्षणिक संस्थाना जागतिक दर्जाची शिक्षण आणि संशोधन संस्था बनण्यास मदत करण्यासाठी केंद्र सरकार वचनबद्ध आहे. या संदर्भात सन 2017 मध्ये सर्वोत्कृष्ट संस्था (आयओई) योजना सुरू करण्यात आली होती. ज्या अंतर्गत केंद्रीय अनुदान आयोगाने (युजीसी) 10 सरकारी आणि 10 खासगी संस्थांना सर्वोत्कृष्ट संस्था म्हणून घोषित केले आहे. जगातील कोणत्याही प्रसिद्ध मानांकन चौकटीत अव्वल 500 मध्ये स्थान मिळवण्यास सक्षम करणे हे या योजनेचे उद्दीष्ट आहे. सरकारी संस्थांना आधीपासूनच मिळत असलेल्या अनुदाना व्यतिरिक्त पाच वर्षांच्या कालावधीत 1000 कोटी रुपयांचे आर्थिक सहाय्य मिळेल. खासगी क्षेत्रातून निवडलेल्या संस्थांमध्ये नाविन्य आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देण्यासाठी स्वायत्तता असेल. देशातील तांत्रिक शिक्षणाची गुणवत्ता सुधारण्यावर भर देण्यासाठी अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने (एआयसीटीई) परीक्षा सुधारणा, अनिवार्य इंटर्नशिप, विद्यार्थ्यांसाठी प्रेरक कार्यक्रम, मॉडेल अभ्यासक्रमात सुधारणा, इंटर्नशिप, उद्योग तयारी मान्यता, स्टार्ट-अप आणि शिक्षकांच्या प्रशिक्षणासाठी राष्ट्रीय उपक्रम इत्यादी विविध दर्जेदार उपक्रम राबवले आहेत.
भारतीय शैक्षणिक संस्थांचे जागतिक क्रमवारीतले स्थान सुधारण्यासाठी आणि विद्यापीठे / संस्थांमध्ये संशोधनाचे प्रमाण आणि गुणवत्ता वाढविण्यासाठी सरकारने विविध उपक्रम घेतले आहेत यामध्ये विविध योजना , पुरस्कार, पाठयवृत्ती , मूलभूत विज्ञान संशोधन, संभाव्य सर्वोत्कृष्ट विद्यापीठे व महाविद्यालये नाविन्यपूर्ण संशोधन व तंत्रज्ञान (आयएमपीआरआयएनटी), उच्चतर अविष्कार योजना (यूएवाय) योजना, सामाजिक विज्ञानातील प्रभावी धोरण संशोधन (आयएमप्रेस), ट्रान्स-शिस्तविषयक संशोधन योजना भारताची विकसनशील अर्थव्यवस्था (एसटीआरईडीई), शैक्षणिक आणि संशोधन सहकार्य प्रोत्साहन, लघु आणि प्रमुख संशोधन प्रकल्प (एमआरपी) , उत्कृष्टता केंद्रांची स्थापना, संशोधन पार्क, आणि तंत्रज्ञान व्यवसाय इनक्यूबेटर (टीबीआय), पंतप्रधान संशोधन पाठ्यवृत्ती , भारतात शिक्षण, संशोधन कार्यशाळा, चर्चासत्र आणि परिषद आणि इमेरिटस फेलोशिप इ.चा समावेश आहे.
एआयसीटीई त्यांच्या शैक्षणिक विकास कार्यक्रमांतर्गत (एफडीपी) संशोधनात गुंतलेल्या शिक्षकांना आंतरराष्ट्रीय परिषदा / चर्चसत्रात भाग घेण्यासाठी परिषदेचे आयोजन आणि प्रवासी अनुदान देते.
केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल ‘निशंक’ यांनी आज राज्यसभेत लेखी उत्तरात ही माहिती दिली.
B.Gokhale/S.Kane/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1655861)
Visitor Counter : 139