युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय
गोव्यात होणाऱ्या 36 व्या राष्ट्रीय स्पर्धा कोविड- 19 महामारीमुळे पुढे ढकलण्यात आल्या आहेत
Posted On:
17 SEP 2020 7:03PM by PIB Mumbai
गोव्यात 20 ऑक्टोबर ते 4 नोव्हेंबर दरम्यान होणाऱ्या 36 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा कोविड - 19 महामारीमुळे पुढे ढकलण्यात आल्या आहेत.
36 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी पायाभूत सुविधांच्या बांधकाम आणि विकासासाठी केंद्र सरकारने गोवा सरकारला 97.80 कोटी रुपयांचा निधी दिला आहे.
पहिला खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स ओडिशा येथे 22 फेब्रुवारी ते 1 मार्च 2020 दरम्यान यशस्वीरित्या आयोजित करण्यात आला. यामध्ये 17 क्रीडा प्रकारांसाठी 158 विद्यापीठांमधून एकूण 3182 स्पर्धकांनी सहभाग घेतला.
राज्य सरकार, संबंधित राष्ट्रीय क्रीडा संघटना, स्पोर्ट्स प्रमोशन बोर्ड इत्यादींच्या माध्यमातून खेळाडू आणि संघांना राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेविषयी माहिती आहे. राष्ट्रीय खेळांच्या तारखा निश्चित झाल्यावर भारतीय ऑलिम्पिक असोसिएशन आणि राष्ट्रीय क्रीडा आयोजन समिती राष्ट्रीय खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी मुद्रित मध्यम, इलेक्ट्रॉनिक मीडिया, सोशल मीडिया अशा विविध माध्यमातून प्रसिद्धी करते.
केंद्रीय युवा कार्य व क्रीडा राज्यमंत्री (आयसी) किरेन रिजिजू यांनी आज लोकसभेत लेखी उत्तरात ही माहिती दिली.
****
B.Gokhale/S. Tupe/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1655771)
Visitor Counter : 330