वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय

वैद्यकीय वस्तूंची निर्यात

Posted On: 16 SEP 2020 6:07PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 16 सप्‍टेंबर 2020

 

पीपीई कव्हर, 2/3 आवरणाचे मास्क, फेस शिल्ड्स, सॅनिटायझर्स (डिस्पेंसर पंप असलेल्या कंटेनरमधील निर्यातीशिवाय), हायड्रॉक्सीक्लोरोक्विन एपीआय आणि त्याचे फॉर्म्युलेशन, 13 इतर फार्मास्युटिकल एपीआय आणि त्याचे फॉर्म्युलेशन आणि व्हेंटिलेटर अशा विविध वैद्यकीय वस्तूंच्या निर्यातीवरील बंदी हटविण्यात आली आहे. डायग्नोस्टिक किट्स, एन 95 / एफएफपी 2 मास्क निर्यातीवर सध्या प्रतिबंध आहे, मात्र मासिक कोट्यानुसार त्याच्या निर्यातीला परवानगी देण्यात आली आहे.

कोविड -19 विरुद्ध लढा देण्यासाठी या वस्तूंची देशांतर्गत उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी वैद्यकीय वस्तूंच्या निर्यातीवर बंदी घालण्यात आली होती. देशांतर्गत गरज, उत्पादन क्षमता आणि निर्यातीसाठी उपलब्ध असलेल्या अतिरिक्त वस्तूंचे मूल्यांकन केल्यानंतर वेळोवेळी ही बंदी शिथिल करण्यात आली आहे.

20 मार्च 2020 पूर्वी, पीपीई किटची आवश्यकता पूर्ण करण्यासाठी मोठ्या प्रमाणात आयात केली जात होती, कारण देशात कोविड –19 च्या आवश्यकतेच्या तुलनेत  याचे उत्पादन मर्यादित प्रमाणात होत होते. पीपीई किटचे  देशांतर्गत उत्पादन दरमहा 1.5 कोटी युनिट्सपर्यंत पोहोचल्यानंतर पीपीई किटवरील निर्यात बंदी हटविण्यात आली. देशात अल्कोहोल आधारित हँड सॅनिटायझर्सची उपलब्धता वर्षाकाठी 10 लाख लिटर होती. त्यानंतर ही उत्पादन क्षमता दररोज 38 लाख लिटरपर्यंत वाढवण्यात आली आणि ज्यामुळे अल्कोहोल आधारित हँड सॅनिटायझर्स (डिस्पेंसर पंप असलेल्या कंटेनरमध्ये निर्यात केल्याशिवाय) च्या निर्यातीवर बंदी उठवण्यात आली .

जानेवारी 2020 पूर्वी देशातील व्हेंटिलेटरचे उत्पादन नगण्य होते, आज देशांतर्गत तयार होणार्‍या व्हेंटिलेटरमुळे देश व्हेंटिलेटरची निर्यात करण्यास सक्षम आहे.

केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी आज लोकसभेत लेखी उत्तरात ही माहिती दिली.

 

* * *

S.Thakur/S.Mhatre/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1655194) Visitor Counter : 209