अर्थ मंत्रालय

कोविड -19 चा सामना करण्यासाठी राज्यांना दिलेला निधी

Posted On: 14 SEP 2020 7:08PM by PIB Mumbai

 

कोविड -19 साथीच्या आजारामुळे उद्भवलेली परिस्थिती लक्षात घेऊन, या परिस्थितीचा सामना करण्यासाठी राज्यांना मजबूत करण्यासाठी, 3 एप्रिल 2020 रोजी केंद्र सरकारने राज्य आपत्ती प्रतिसाद निधीचा (एसडीआरएफ) 11,092 कोटी रुपयांचा पहिला हप्ता राज्यांना वितरीत केला. केंद्रीय अर्थ व कॉर्पोरेट व्यवहार राज्यमंत्री  अनुरागसिंग ठाकूर यांनी आज लोकसभेत विचारलेल्या लेखी प्रश्नाला उत्तर देताना ही माहिती दिली.

अधिक माहिती देताना ठाकूर म्हणाले की, राज्य सरकारांना वर्ष 2020-21 साठी  सकल राज्य देशांतर्गत उत्पादनाच्या (जीएसडीपी) दोन टक्क्यांपर्यंत अतिरिक्त कर्ज घेण्याची परवानगी देण्यात आली आहे. 2020-21 दरम्यान  जीएसडीपीच्या 0.50 टक्के कर्ज खुल्या बाजारातून (ओएमबी) घेण्यासाठी राज्यांना आधीच परवानगी दिली आहे. यातून 1,06,830 कोटी रुपये उभे करता येतील.

वितरीत निधीचा राज्य-निहाय तपशील परिशिष्ट-I आणि वर्ष 2020-21 साठी राज्यांना दिलेला जीएसडीपी च्या 0.5% अतिरिक्त कर्जाचा राज्य-निहाय तपशील परिशिष्ट-II मध्ये आहे असे ठाकूर यांनी सांगितले.

 

 

ANNEXURE-I

 

 

 

 

ANNEXURE-II

 

 

****

M.Chopade/S.Mhatre/P.Kor

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1654171) Visitor Counter : 127