संरक्षण मंत्रालय
जम्मू-काश्मीरमध्ये पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन
Posted On:
14 SEP 2020 7:01PM by PIB Mumbai
जम्मू भागात यावर्षी नियंत्रण रेषेलगत शस्त्रसंधी उल्लंघनाच्या 3186 घटना (01 जानेवारी ते 07 सप्टेंबर 2020 पर्यंत) घडल्या आहेत. याव्यतिरिक्त, जम्मू प्रदेशात भारत-पाकिस्तान आंतरराष्ट्रीय सीमेवर यावर्षी (01 जानेवारी ते 31 ऑगस्ट, 2020) दरम्यान सीमेपलिकडून गोळीबाराच्या 242 घटना घडल्या आहेत.
यावर्षी जम्मू आणि काश्मीरमध्ये (07 सप्टेंबर 2020 पर्यंत) 08 जवानांचा मृत्यू झाला असून 2 जवान जखमी झाले. याव्यतिरिक्त, जम्मू आणि काश्मीरमध्ये आंतरराष्ट्रीय सीमा आणि नियंत्रण रेषेजवळ सीमा सुरक्षा दलाचे 05 जवान जखमी झाले आहेत.
शस्त्रसंधी उल्लंघन घटनांना आवश्यकतेनुसार, भारतीय सैन्य / बीएसएफकडून चोख प्रत्त्युत्तर देण्यात आले. याव्यतिरिक्त, शस्त्रसंधी उल्लंघनाची सर्व प्रकरणे पाकिस्तानी अधिकाऱ्यांना हॉटलाइन प्रणाली , ध्वज बैठक, लष्करी कारवाया महासंचालक चर्चेच्या माध्यमातून तसेच दोन्ही देशांदरम्यान राजनैतिक मार्गांद्वारे कळवण्यात आली.
संरक्षण राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी आज राज्यसभेत श्री सीएम रमेश यांना लेखी उत्तरात ही माहिती दिली.
M.Chopade/S.Kane/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1654167)
Visitor Counter : 187