रसायन आणि खते मंत्रालय

मांडवीय यांनी रामगुंडम येथील आरएफसीएलच्या आगामी युरिया प्रकल्पाच्या प्रगतीचा आढावा घेतला


लॉकडाऊन दरम्यान आणि नंतर आरएफसीएलने केलेल्या कामाची केली प्रशंसा, 90% हून अधिक प्रकल्प पूर्ण

Posted On: 12 SEP 2020 7:50PM by PIB Mumbai

नवी दिल्ली,  12 सप्टेंबर  2020

केंद्रीय रसायने आणि खते आणि नौवहन राज्यमंत्री (स्वतंत्र कार्यभार ) मनसुख मांडवीय  यांनी आज रामगुंडम फर्टिलिझ अँड केमिकल्स लिमिटेड (आरएफसीएल) च्या आगामी युरिया युनिटला भेट दिली आणि  कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांबरोबर प्रकल्पाच्या प्रगतीचा आढावा घेतला.

मांडवीय यांच्यासमवेत गृह राज्यमंत्री किशन रेड्डी राज्यमंत्री खत विभागाचे अतिरिक्त सचिव धरमपाल, आरएफसीएलचे मुख्य कार्यकारी अधिकारी  निर्लेप सिंह राय आणि आरएफसीएलचे प्रकल्प -कार्यकारी संचालक राजन थापर  होते. या भेटीदरम्यान मांडवीय  यांनी मुख्य नियंत्रण कक्षासारख्या संयंत्र एककांना भेट दिली जिथे कडुनिंब आच्छादित युरिया उत्पादन प्रक्रियेची माहिती आरएफसीएलच्या अधिकाऱ्यांनी दिली. त्यानंतर रिफॉर्मर आणि  बॅगिंग प्लांटला भेट दिली.

मांडवीय यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेण्यात आली ज्यामध्ये आरएफसीएलच्या अधिकाऱ्यांनी  सादरीकरणाच्या माध्यमातून प्रगतीची माहिती दिली. गृह राज्यमंत्री किशन रेड्डी राज्यमंत्री, खत विभागाचे अतिरिक्त सचिव धरमपालआरएफसीएल आणि ईआयएलचे वरिष्ठ अधिकारी यांच्यासह अन्य सरकारी अधिकारी या बैठकीला उपस्थित होते.

B.Gokhale/S.Kane/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1653675) Visitor Counter : 104