कृषी मंत्रालय
गेल्या वर्षीच्या तुलनेत खरीप पिकांच्या पेरणी क्षेत्रात सुमारे 59 लाख हेक्टरची वाढ
तेलबियांच्या पेरणी क्षेत्रात 10 % जास्त वाढ
Posted On:
11 SEP 2020 6:03PM by PIB Mumbai
खरीप पिकांच्या पेरणी क्षेत्रात विक्रमी प्रगती नोंदवत 1104.54 लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली असून गेल्या वर्षी याच काळात 1045.18 लाख हेक्टर क्षेत्रावर ही पेरणी झाली होती. भाताची पेरणी अद्याप सुरु असून डाळी, भरड धान्य आणि तेलबिया यांची पेरणी जवळपास पूर्ण होत आली आहे. खरीप हंगामाच्या पेरणीची अंतिम आकडेवारी 1 ऑक्टोबर 2020 ला कळेल अशी अपेक्षा आहे.
· तांदूळ : 402.25 लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी, गेल्या वर्षीच्या याच काळात 373.87 लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी
· डाळी : 137.87 लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी, गेल्या वर्षी 131.76 लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी
· भरड धान्य : 179.70 लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी, गेल्या वर्षी 177.43 लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी
· तेलबिया : 195.99 लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी, गेल्या वर्षी 176.91 लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी
· ऊस : 52.46 लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी, गेल्या वर्षी 51.75 लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी,
· कापूस : 129.30 लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी, गेल्या वर्षी 126.61 लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी
· ताग आणि मेस्ता : 6.97 लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी, गेल्या वर्षी 6.86 लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी
आतापर्यंत खरीप पिकाच्या पेरणी क्षेत्राच्या प्रगतीवर कोविड-19 चा परिणाम झालेला नाही. सरकारच्या योजना आणि मिशन कार्यक्रमांच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी कृषी मंत्रालय आणि राज्य सरकारांचे सर्वतोपरी प्रयत्न सुरु आहेत. सरकारकडून बियाणे, कीटकनाशके, खते, यंत्रसामग्री आणि पतपुरवठा वेळेवर उपलब्ध झाल्याने महामारीमुळे लागू झालेल्या लॉकडाऊन काळातही मोठ्या क्षेत्रावर पेरण्या शक्य झाल्या. वेळेवर कृती, तंत्रज्ञानाचा स्वीकार आणि सरकारी योजनांचा लाभ घेण्याचे श्रेय शेतकऱ्याकडे जाते.
S.
No.
|
Crop
|
Area Sown in lakh ha
|
% Increase
|
2020-21
|
2019-20
|
2019-20
|
1
|
Rice
|
402.25
|
373.87
|
7.59
|
2
|
Pulses
|
137.87
|
131.76
|
4.64
|
3
|
Coarse cereals
|
179.70
|
177.43
|
1.28
|
4
|
Oilseeds
|
195.99
|
176.91
|
10.79
|
5
|
Sugarcane
|
52.46
|
51.75
|
1.37
|
6
|
Jute & Mesta
|
6.97
|
6.86
|
1.68
|
7
|
Cotton
|
129.30
|
126.61
|
2.12
|
Total
|
1104.54
|
1045.18
|
5.68
|
10.09.2020 पर्यंत देशात 828.6 मिमी पाऊस झाला, सर्वसामान्य पावसाची पातळी 777.3 मिमी असून 01.06.2020 ते 10.09.2020 या काळात 7 % अधिक पाऊस झाला आहे.
केंद्रीय जल आयोगाकडून मिळालेल्या माहिती नुसार 10.09.2020 रोजी देशातल्या 123 धरणात, गेल्या वर्षीच्या याच काळाच्या 102% तर गेल्या दहा वर्षाच्या सरासरी जलसाठ्याच्या 118% जलसाठा उपलब्ध आहे.
अधिक तपशिलासाठी इथे क्लिक करा –
M.Chopade/N.Chitale /P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1653375)
Visitor Counter : 202