नागरी उड्डाण मंत्रालय

हरदीप सिंग पुरी घेणार दरभंगा आणि देवघर विमानतळ कार्याचा आढावा

प्रविष्टि तिथि: 10 SEP 2020 4:45PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 10 सप्‍टेंबर 2020


केंद्रीय हवाई वाहतूक राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) हरदीप सिंग पुरी बिहार आणि झारखंड राज्यांना भेट देऊन 12 सप्टेंबर रोजी भेट देऊन दरभंगा आणि देवघर विमानतळाचा आढावा घेणार आहेत. भारतीय विमानतळ प्राधिकरण या विमानतळांचा विकास करत आहे. या विमानतळांच्या वापरामुळे परिसरातील हवाई वाहतूक सुधारेल. तसेच, यामुळे पर्यटनाला चालना मिळून प्रदेशात रोजगारनिर्मिती वाढेल. या विमानतळांमुळे दळणवळणाच्या माध्यमातून आर्थिक कृतींमध्ये वाढ होईल, यामुळे प्रदेशातील जनतेचा सर्वांगीण आर्थिक विकास होईल.

हरदीपसिंग पुरी यांनी नुकतीच उत्तर प्रदेशीतल कुशीनगर विमानतळाला भेट दिली होती. त्यांनी विमानतळाच्या कार्याचा आढावा घेतला आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी हवाई वाहतूक पायाभूत सुविधा आणि दळणवळणासंदर्भात चर्चा केली.

दरभंगा विमानतळ

भारतीय विमानतळ प्राधिकरणाकडून दरभंगा विमानतळाचे काम सुरु आहे, प्रादेशिक संपर्क योजनेअंतर्गत याठिकाणाहून दिल्ली, मुंबई आणि बेंगळुरुसाठी हवाई वाहतूक सुरु करण्यात येणार आहेत.

देवघर विमानतळ

झारखंडमधील देवघर विमानतळाचे काम भारतीय विमानतळ प्राधिकरणाकडून संरक्षण संशोधन आणि विकास संस्था आणि राज्य सरकारच्या सहकार्याने सुरु आहे. 401.34 कोटी रुपये या प्रकल्पाचा खर्च आहे, लवकरच काम पूर्ण होईल. विमानतळाचा विस्तार 653.75 एकर जमिनीवर आहे आणि टर्मिनल इमारत 4000 स्के.मीटर जागेत बांधण्यात येत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 25 मे 2018 रोजी व्हिडीओ लिंकच्या माध्यमातून देवघर विमानतळाचा पायाभरणी सोहळा पार पडला होता. देवघर हे झारखंड राज्यातील रांचीनंतरचे दुसरे विमानतळ आहे.  

 

* * *

M.Chopade/S.Thakur/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(रिलीज़ आईडी: 1653021) आगंतुक पटल : 174
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Manipuri , Punjabi , Tamil