सामाजिक न्याय आणि सबलीकरण मंत्रालय
थावरचंद गहलोत यांनी व्हर्च्युअल पद्धतीने अलिम्कोच्या संशोधन आणि विकास इमारतीचे उद्घाटन केले
Posted On:
09 SEP 2020 7:18PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 9 सप्टेंबर 2020
केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्री थावरचंद गहलोत यांनी आज सामाजिक न्याय व सशक्तीकरण मंत्रालयाच्या डीईपीडब्ल्यूडी अंतर्गत कृत्रिम अवयव निर्मिती महामंडळ (अलिमको ), कानपूरच्या संशोधन आणि विकास इमारतीचे व्हर्च्युअल पद्धतीने उद्घाटन केले. कानपूर (उत्तर प्रदेश ) मधील लोकप्रतिनिधी, शकुंतला डी. गॅमलिन, सचिव, डीईपीडब्ल्यूडी आणि वरिष्ठ अधिकारी ऑनलाईन उपस्थित होते.
यावेळी बोलताना गहलोत म्हणाले की, संशोधन आणि विकास (आर अँड डी) इमारतीतील अत्याधुनिक सुविधांमुळे तसेच आयआयटी कानपूरसारख्या प्रतिष्ठित संस्थेचे सहकार्य लाभल्यामुळे विद्यमान उत्पादन आणि इन हाऊस नवीन सहाय्यक उपकरणाच्या विकासामध्ये अलिम्कोची क्षमता मोठ्या प्रमाणात सुधारेल. यामुळे आपल्या देशातील ‘दिव्यांगजन’ आणि “ज्येष्ठ नागरिक” यांना सेवा पुरवण्यात ते उपयुक्त ठरेल.
ही संशोधन आणि विकास इमारत एकूण 1856 चौरस मीटर क्षेत्रात उभारली असून चार मजल्यांचे बांधकाम आहे. तळमजल्यावर स्पेक्ट्रोमीटर, युनिव्हर्सल टेस्टिंग मशिन्स इत्यादी गुणवत्ता नियंत्रण आणि डिझाइन आणि विकासासाठी विविध प्रकारच्या चाचणी आणि हाय एंड प्रेसिजन मशीनसाठी सुविधा उपलब्ध आहे. तळमजल्याचे एकूण क्षेत्रफळ 481.75 चौ.मीटर आहे. पहिल्या मजल्यावर गुणवत्ता नियंत्रण कार्यालय आणि प्रयोगशाळा सुविधा आहे. दुसऱ्या मजल्यावर डिझाईन आणि विकास कार्यालय आणि प्रयोगशाळा आहे. तळमजल्याचे एकूण क्षेत्र 446.37 चौरस मीटर असून परिपूर्ण बीटीई असेंब्ली, चाचणी आणि स्टोरेजसाठी सुविधा उपलब्ध आहे. या मजल्याचे वैशिष्ट्य म्हणजे ईएसडी (इलेक्ट्रो स्टॅटिक डिस्चार्ज) फ्लोअरिंग आहे. पूर्ण इमारतीचे बांधकाम पीडब्ल्यूडीच्या विचाराधीन आहे आणि पर्यावरण सुरक्षेच्या दृष्टीने रेन वॉटर हार्वेस्टिंगची तरतूद आहे.
M.Chopade/S.Kane/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1652726)
Visitor Counter : 110