सुक्ष्म, लघु आणि मध्यम उदयोग मंत्रालय

एमएसएमईचा जीडीपीमध्ये वाटा सुमारे 30 % वरुन 50% करणार; आणि निर्यात 49% वरुन 60% करणार: नितीन गडकरी


एमएसएमई क्षेत्रात 5 वर्षांत 5 कोटी अतिरिक्त रोजगारनिर्मितीचे लक्ष्य

Posted On: 09 SEP 2020 6:42PM by PIB Mumbai

 नवी दिल्ली,  9 सप्टेंबर  2020

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग, एमएसएमई खात्याचे मंत्री नितीन गडकरी म्हणाले की, एमएसएमईचा जीडीपीमधील वाटा सुमारे 30% वरुन 50% करण्याचे; आणि निर्यात 49% वरुन 60% करण्याचे ध्येय आहे. आत्मनिर्भर भारत अराईज अटल न्यू इंडिया चॅलेंजेस या नीती आयोगाच्या आभासी बैठकीत ते बोलत होते. ते म्हणाले, एमएसएमई क्षेत्रात 5 कोटी अतिरिक्त रोजगारनिर्मितीचे सरकारचे ध्येय आहे, सध्या या क्षेत्रात 11 कोटी लोक कार्यरत आहेत. 

गडकरींनी नीती आयोगाच्या आत्मनिर्भर भारत अराईज अटल न्यू इंडिया चॅलेंज उपक्रमाचे कौतुक केले आणि मूल्यवर्धन सुनिश्चित करून वेगवेगळ्या क्षेत्रात येणाऱ्या अडचणींवर तोडगा काढण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करण्यास प्रोत्साहित करण्यासाठी काम करण्यास सांगितले. त्यांनी अतिरिक्त तांदळाचे उदाहरण दिले, ते म्हणाले यापासून इथेनॉलनिर्मिती केल्यास एकीकडे साठवणूकीचा प्रश्न मिटेल आणि दुसरीकडे देशाला महत्त्वाचा पर्याय म्हणून हरित इंधन उपलब्ध होईल. या विषयावर अधिक माहिती देताना ते म्हणाले की नवकल्पना/नवीन उपाय शोधण्यासाठी प्रोत्साहन देणे आवश्यक आहे आणि या प्रक्रियेत चुका करणार्‍यांनाही संरक्षित केले पाहिजे.

गडकरी यांनी भर देऊन सांगितले की, 115 आकांक्षी जिल्ह्यांसह मागास प्रदेशांचा विकास झाल्यास देशाचा विकास जलद होईल. त्यांनी निदर्शनास आणून दिले की, पंतप्रधानांनी सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या मागास भागावर भर दिला आहे. आपण सर्वांनी पंतप्रधानांच्या ध्येयानुसार कार्य केले पाहिजे, अनसूचित जाती आणि अनुसूचित जमातीसह सामान्य लोकांच्या समस्या सोडवल्या पाहिजेत. 

नितीन गडकरी यांनी नवीन प्रज्ञावंतांना विकासाची संधी मिळावी यासाठी नवकल्पना आणि उद्योजकतेसाठी पाठिंब्याची आवश्यकता असल्याचे सांगितले. यामुळे खर्चही कमी येईल. शेतकऱ्यांसाठी आणि एससी/एसटीसाठीच्या योजनांच्या कामगिरीचे मुल्यमापन करावे जेणेकरुन अशा योजनांचे ध्येय अधिक चांगले साध्य होईल. 

आत्मनिर्भर भारत अराईज अटल न्यू इंडिया आव्हान कार्यक्रमाचा उद्देश विविध मंत्रालयांच्या सक्रीय सहयोगाने आणि उद्योगांच्या मदतीने संशोधन, नवकल्पना आणि या क्षेत्रीतील समस्यांवर नावीन्यपूर्ण संशोधन करणे हा आहे.

 

M.Chopade/S.Thakur/P.Malandkar

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1652709) Visitor Counter : 206