शिक्षण मंत्रालय
शिक्षक पर्व उपक्रमांतर्गत सर्वसमावेशक आणि न्याय्य शिक्षणावर शिक्षण मंत्रालयाकडून वेबिनारचे आयोजन
Posted On:
09 SEP 2020 6:15PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 9 सप्टेंबर 2020
शिक्षण पर्व उपक्रमांतर्गत शिक्षण मंत्रालयाच्या वतीने आज सर्वसमावेशक आणि न्याय्य शिक्षणावर वेबिनार आयोजित करण्यात आले. शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाचे सचिव अनिता करवाल, सहसचिव संतोष कुमार यादव, सहसचिव मनीष गर्ग, सहसचिव विपिन कुमार, एनसीईआरटीचे संचालक प्राध्यापक हृषिकेश सेनापति उपस्थित होते. प्रा अनिता जूलका, एनसीईआरटी, प्रा.स्मृती स्वरूप, एनसीईआरटी, प्रा. अनुपम आहुजा, एनसीईआरटी, प्रा. विम्मी सिंग, एनसीईआरटी आणि प्रा.इ.सुरेश, कुलगुरू, इंग्रजी व विदेशी भाषा विद्यापीठ, हैदराबाद आणि उच्च शिक्षण तज्ज्ञांनी वेबिनार दरम्यान सर्वसमावेशक आणि न्याय्य शिक्षणाबद्दल सविस्तर सादरीकरण केले.
वेबिनार दरम्यान, एनसीईआरटीच्या तज्ञांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 विषयी मत व्यक्त केले. ज्यामध्ये मुली, अनुसूचित जाती जमातीतील मुले, आदिवासी जमातीतील मुले आणि इतर मागासवर्गीय इत्यादीसारख्या शिक्षणापासून वंचित गटांच्या विशेष गरज असलेल्या मुलांच्या शिक्षणाचा समावेश आहे. त्यांनी पुढे नमूद केले की, पूर्व प्राथमिक ते बारावीपर्यंतच्या आसपासच्या शाळांमध्ये खास गरजा असणार्या मुलांना समाविष्ट करणे, शाळा आणि शाळा संकुलांना विशिष्ट आर्थिक सहाय्य तसेच गंभीर किंवा बहुविध अपंगत्व असलेल्या विद्यार्थ्यांसाठी संसाधन केंद्रांची स्थापना करणे , अडथळा मुक्त प्रवेश, सहाय्यक उपकरणे, ब्रेल पुस्तके आणि मोठ्या मुद्रित पुस्तके इत्यादी शिकणार्यांसाठी योग्य आणि विशिष्ट समर्थनाची तरतूद, गंभीर आणि विशिष्ट अपंगत्व असलेल्या मुलांसाठी गृह-आधारित शिक्षण आणि शिक्षण सामग्रीचा व्यापक प्रमाणात प्रसार, सहयोग, एनजीओ आणि व्हीओज यांच्या सहकार्याने मूल्यांकन तसेच समुदाय जमवाजमव, बधिर विद्यार्थ्यांसाठी मुक्त शाळा, 'शाळा कॉम्प्लेक्स' स्तरावर विशेष शिक्षकांची नेमणूक आणि सर्व विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजा पूर्ण करण्यासाठी क्रॉस-डिसेबिलिटी प्रशिक्षण, गृह-आधारित शिक्षण कार्यक्रमातील सीडब्ल्यूएसएन, माध्यमिक स्तरावरील प्रतिभावान आणि गुणवंत सीडब्ल्यूएसएनसाठी शिष्यवृत्ती या बाबींवर भर देण्यात आला आहे.
वेबिनारमध्ये, सादरीकरणादरम्यान द भारतीय संकेतिक भाषा (आयएसएल) वर भर देण्यात आला जी प्रामुख्याने दक्षिण आशियाई देशांमध्ये वापरली जाते. आयएसएलमध्ये अनेक खास वैशिष्ट्ये आहेत ज्यामुळे ती इतर संकेत भाषेपेक्षा वेगळी ठरते. नंबर चिन्हे, कौटुंबिक संबंध, जागेचा वापर इत्यादी वैशिष्ट्ये ही आयएसएलची महत्त्वपूर्ण वैशिष्ट्ये आहेत.
एनसीईआरटीने युनिव्हर्सल डिझाईन फॉर लर्निंग (यूडीएल) बद्दल देखील माहिती दिली ज्याचा उपयोग सर्वसाधारण शिक्षण आणि विशेष शिक्षण घेणार्या विद्यार्थ्यांच्या सर्वसमावेशक सूचनांसाठी वर्गात केला जाऊ शकतो, जे सामान्य शिक्षण विद्यार्थ्यांना बहुविध पद्धतीने शिकण्याची सुविधा मिळवून देते आणि विशेष गरजा असलेल्या विद्यार्थ्यांमध्ये स्वतःच्या मालकीची जाणीव वाढवते.
B.Gokhale/S.Kane/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1652695)
Visitor Counter : 175