पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधान 10 सप्टेंबर रोजी प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना सुरू करणार

पंतप्रधान ई-गोपाला अ‍ॅप : शेतकऱ्यांच्या थेट वापरासाठी एक व्यापक प्रजनन सुधारणा बाजारपेठ आणि माहिती पोर्टल सुरु करणार

पंतप्रधान बिहारमध्ये मत्स्यपालन आणि पशुसंवर्धन क्षेत्रात इतरही अनेक उपक्रमांची सुरुवात करणार

Posted On: 09 SEP 2020 5:25PM by PIB Mumbai

नवी दिल्ली,  9 सप्टेंबर  2020

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी 10 सप्टेंबर रोजी प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना (पीएमएमएसवाय) डिजिटल पद्धतीने  सुरू करणार आहेत. पंतप्रधान ई-गोपाला अ‍ॅप देखील सुरू करणार आहेत, हे ऍप्प  शेतक ऱ्यांच्या  थेट वापरासाठी एक व्यापक प्रजनन  सुधारणा बाजारपेठ आणि माहिती पोर्टल आहे. तसेच  बिहारमध्ये मत्स्यव्यवसाय व पशुसंवर्धन क्षेत्रातील इतरही अनेक उपक्रम पंतप्रधानांच्या हस्ते सुरु केले जाणार  आहेत.

केंद्रीय मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय मंत्री आणि राज्यमंत्री  यांच्यासह बिहारचे राज्यपाल आणि मुख्यमंत्रीही या वेळी उपस्थित राहणार आहेत.

प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना

प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना (पीएमएमएसवाय) ही देशातील मत्स्यउद्योग  क्षेत्राच्या  केंद्रित आणि शाश्वत विकासासाठी एक महत्वाकांक्षी योजना असून  आत्मनिर्भर भारत पॅकेजचा एक भाग म्हणून, सर्व राज्ये / केंद्रशासित प्रदेशांमध्ये आर्थिक वर्ष 2020-21 ते आर्थिक वर्ष 2024-25 पर्यंत 5 वर्षांच्या कालावधीत त्याच्या अंमलबजावणीसाठी  अंदाजे 20,050  कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली आहे. पीएमएमएसवाय अंतर्गत 20,050 कोटी रुपयांची गुंतवणूक ही मत्स्यव्यवसाय क्षेत्रातली  आतापर्यंतची सर्वाधिक गुंतवणूक आहे. यापैकी सागरी, अंतर्देशीय मत्स्यव्यवसाय आणि जलशेती मधील लाभार्थीभिमुख उपक्रमांसाठी 12340 कोटी रुपये आणि मत्स्यव्यवसाय पायाभूत सुविधांसाठी सुमारे 7710 कोटी रुपये प्रस्तावित आहेत.

2024-25 पर्यंत मासळीचे उत्पादन अतिरिक्त 70 लाख टनाने  वाढवणे, 2024-25 पर्यंत मत्स्यपालन निर्यात महसूल 1,00,000 कोटी रुपयांपर्यंत वाढवणे , मत्स्यपालक आणि मत्स्य शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणे आणि कापणीनंतरचे नुकसान 20-25% वरून 10% पर्यंत कमी करणे आणि मत्स्यव्यवसाय क्षेत्र आणि संबंधित कामांमध्ये अतिरिक्त  55 लाख प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष फायदेशीर रोजगाराच्या संधी निर्माण करणे हे पीएमएमएसवायचे उद्दिष्ट आहे.  

पीएमएमएसवाय ही मत्स्य उत्पादन आणि उत्पादकता, गुणवत्ता, तंत्रज्ञान, सुगीनंतरची पायाभूत सुविधा आणि व्यवस्थापन, आधुनिकीकरण आणि मूल्य साखळी, शोध क्षमता  मजबूत करणे , मत्स्यव्यवसाय व्यवस्थापनाची चौकट आणि मत्स्यपालकांच्या कल्याणासंबंधी  समस्या सोडविण्यासाठी तयार केले आहे.  नील क्रांती  योजनेच्या कामगिरीचे एकत्रीकरण करण्याच्या उद्देशाने पीएमएमएसवाय मध्ये अनेक नवीन हस्तक्षेपांची कल्पना मांडली आहे उदा. मत्स्योद्योग बोटींचा विमा, मत्स्यउद्योग जहाज / बोटींचे नवीन / उन्नतीकरण, बायो-टॉयलेट्स, खाऱ्या पाण्यात  / क्षारीय भागात  सागर मित्र, एफएफपीओ / सीएस, न्यूक्लियस पैदास केंद्रे, मत्स्यपालन आणि मत्स्यशेती स्टार्टअप्स, इनक्यूबेटर, एकात्मिक एक्वा पार्क, एकात्मिक किनारपट्टी मासेमारी खेड्यांचा विकास, जलचर प्रयोगशाळा नेटवर्क आणि विस्तार सेवा, शोधक्षमता ,प्रमाणीकरण  आणि मान्यता, आरएएस, बायोफ्लॉक आणि केज कल्चर, ई-ट्रेडिंग / विपणन, मत्स्यव्यवसाय व्यवस्थापन योजना इ.

पीएमएमएसवाय योजना प्रामुख्याने ‘क्लस्टर किंवा क्षेत्र आधारित दृष्टिकोन ’ अवलंबण्यावर आणि मत्स्यव्यवसाय क्लस्टर तयार करण्यावर लक्ष केंद्रित करते. समुद्री शैवाल आणि शोभेच्या माशांच्या लागवडीसारख्या रोजगारनिर्मिती उपक्रमांवर विशेष भर दिला जाईल. दर्जेदार वीण , बियाणे आणि खाद्य यासाठी हस्तक्षेप, प्रजातींच्या विविधतेवर विशेष लक्ष केंद्रित करणे, महत्वपूर्ण पायाभूत सुविधा, विपणन नेटवर्क इत्यादीवर भर देण्यात आला आहे.

आतापर्यंत, पीएमएमएसवाय अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाने पहिल्या टप्प्यात 21 राज्ये / केंद्रशासित प्रदेशांसाठी 1723  कोटी रुपयांच्या प्रस्तावांना मान्यता दिली आहे. पीएमएमवायवाय अंतर्गत उत्पन्न देणाऱ्या कामांना प्राधान्य दिले आहे.

बिहारमधील पीएमएमएसवाय ने 1390 कोटी रुपयांच्या गुंतवणूकीचा अंदाज व्यक्त केला आहे.यात केंद्राचा हिस्सा 535 कोटी रुपये आहे आणि अतिरिक्त मत्स्य उत्पादनाचे लक्ष्य 3  लाख टन ठेवण्यात आले आहे. चालू आर्थिक वर्षात (२०२०-२१), केंद्र सरकारने रिसर्क्युलेटरी  जलचर प्रणाली (आरएएस), बायोफ्लॉक तळ्याचे बांधकाम, फिनफिश  हॅचरी, जलशेतीसाठी नवीन तलावाचे बांधकाम, शोभेच्या माशांचे  युनिट, जलाशयांमध्ये / ओलसर ठिकाणी  पिंजरे बसवणे, आईस प्लांट्स , रेफ्रिजरेटेड वाहने, आईस बॉक्ससह तीनचाकी,मोटर सायकल, सायकल, फिश फीड प्लांट्स, विस्तार व सहाय्य सेवा (मत्स्य सेवा केंद्र), ब्रूड बँकेची स्थापना इ. सारख्या प्रमुख घटकांसाठी 107.00 कोटी रुपये  प्रकल्प खर्चाच्या बिहार सरकारच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे.

मत्स्यव्यवसाय क्षेत्राशी संबंधित इतर उद्‌घाटन कार्यक्रम

पंतप्रधान सीतामढी येथे फिश ब्रूड बँक आणि किशनगंज येथे एक्वाटिक डिसीझ रेफरल प्रयोगशाळा स्थापनेची घोषणा करणार असून त्यासाठी पीएमएमएसवाय अंतर्गत मदत पुरवली गेली आहे. या सुविधा मासे उत्पादकांना वेळेवर गुणवत्तापूर्ण व परवडणारी फिश सीड  उपलब्ध करून देऊन उत्पादन आणि उत्पादकता वाढवण्यात मदत करतील तसेच रोगाचे निदान करण्याची आणि  पाणी व माती परीक्षण सुविधा उपलब्ध करून   देण्याची  गरज पूर्ण करतील.

ते मधेपुरा येथील वन -युनिट फिश फीड गिरणी आणि ब्लू रेव्होल्यूशन अंतर्गत पाटण्यात सहाय्य केलेल्या ‘फिश ऑन व्हील्स’ च्या दोन युनिटचे उद्‌घाटन करणार आहेत. यावेळी ते लाभार्थ्यांशी संवाद साधतील.

डॉ  राजेंद्र प्रसाद केंद्रीय कृषी विद्यापीठ, पुसा, बिहार येथे व्यापक मत्स्य उत्पादन तंत्रज्ञान केंद्राचे  उद्‌घाटन पंतप्रधान करणार आहेत. मासे, बियाणे उत्पादन तंत्रज्ञान व प्रात्यक्षिक युनिट तंत्रज्ञानाची सुविधा असलेले, हे केंद्र  मासे उत्पादनाला चालना आणि मत्स्यपालन करणाऱ्यांची  क्षमता वाढविण्यात मदत करेल. 

ई-गोपाला अ‍ॅप

ई-गोपाला अ‍ॅप हे शेतकयांच्या थेट वापरासाठी एक व्यापक प्रजनन सुधारणा बाजारपेठ आणि माहिती पोर्टल आहे. सर्व प्रकारचे (वीर्य, ​​भ्रूण इत्यादी) रोगमुक्त जंतुनाशक खरेदी व विक्री यासह ; दर्जेदार प्रजनन सेवांची उपलब्धता (कृत्रिम रेतन, पशुवैद्यकीय प्रथमोपचार, लसीकरण, उपचार इ.) आणि पशु पोषण, योग्य आयुर्वेदिक औषध / प्राण्यांच्या पशुवैद्यकीय औषधांचा वापर करून जनावरांवर उपचार करणे यासाठी मार्गदर्शन करण्यासह पशुधनाचे व्यवस्थापन करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी सध्या देशात डिजिटल व्यासपीठ उपलब्ध नाही . लसीकरण, गर्भधारणेचे निदान, वासराचा जन्म याच्या तारखांबाबतची माहिती देण्यासाठी आणि गातील विविध शासकीय योजना व मोहिमेविषयी शेतकऱ्यांना  माहिती देण्याची कोणतीही यंत्रणा नाही. ई-गोपाला ऍप्प या  सर्व बाबींवर शेतकऱ्यांना  उपाय पुरवेल.

पशुसंवर्धन क्षेत्राशी संबंधित इतर उद्‌घाटन

बिहार राज्य सरकारतर्फे उपलब्ध करून देण्यात आलेल्या  75 एकर जागेवर  84.27 कोटी रुपयांच्या गुंतवणूकीसह  बिहारमधील पुर्निया  येथे राष्ट्रीय गोकुळ मिशन अंतर्गत स्थापन केलेल्या अत्याधुनिक सुविधांसह असलेल्या वीर्य स्टेशनचे पंतप्रधान उद्घाटन करतील. वार्षिक 50 लाख वीर्य डोस क्षमतेसह शासकीय क्षेत्रातील सर्वात मोठे वीर्यस्टेशनपैकी एक आहे. हे वीर्य स्टेशन बिहारच्या देशी जातींच्या विकास व संवर्धनास नवीन आयाम देईल आणि पूर्व आणि उत्तर-पूर्व राज्यांची वीर्य डोसची मागणी पूर्ण करेल.

पंतप्रधान राष्ट्रीय गोकुळ मिशन अंतर्गत पाटणा  येथे पशु विज्ञान विद्यापीठात  स्थापित आयव्हीएफ लॅबचे उद्‌घाटन करतील. मदतीसाठी 100% अनुदान देऊन देशभरात एकूण 30 ईटीटी आणि आयव्हीएफ प्रयोगशाळा स्थापन केल्या जात आहेत. या प्रयोगशाळा  देशी जातीच्या उच्चभ्रू प्राण्यांचा प्रसार करण्यासाठी आणि त्याद्वारे दुधाचे उत्पादन आणि उत्पादकता वाढविण्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत.

बिहारमधील बेगूसराय जिल्ह्यात बरोनी दूध संघातर्फे राष्ट्रीय गोकुळ मिशन अंतर्गत कृत्रिम रेतनात कृत्रिम रेत तयार केलेल्या वीर्यवापरांचा शुभारंभ पंतप्रधान  करणार आहेत. कृत्रिम बुद्धिमत्तेत  लिंगानुसार वेगळे केलेले  वीर्य वापरल्यामुळे केवळ मादी वासरे तयार करता येतात (90% पेक्षा जास्त अचूकतेसह). यामुळे देशातील दुधाच्या उत्पादनाचा  वाढीचा दर दुपटीने वाढायला मदत होईल. पंतप्रधान शेतकऱ्यांच्या दारी  आयव्हीएफ तंत्रज्ञानाचे प्रदर्शनही सुरू करणार आहेत. हे उच्च उत्पन्न देणार्‍या प्राण्यांचे वेगवान दराने गुणाकार करण्याच्या तंत्रज्ञानाचा प्रसार करेल कारण तंत्रज्ञानाचा वापर करून ते एका वर्षात 20 वासरे जन्माला घालू शकतात.

 

B.Gokhale/S.Kane/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai@gmail.com(Release ID: 1652670) Visitor Counter : 706