रेल्वे मंत्रालय

आरपीएफने देशव्यापी तपासणीत रेल्वे आरक्षणाच्या पुष्टीसाठी वापरल्या जाणार्‍या “रिअल मॅंगो” नावाच्या बेकायदेशीर सॉफ्टवेअरचे कामकाज खंडित केले.


हे सॉफ्टवेअर आता पूर्णपणे निकामी झाले आहे.

या अवैध सॉफ्टवेअरच्या कारभारामध्ये गुंतलेल्या जवळपास 50 गुन्हेगारांना पकडण्यात आणि 5 लाख

रुपयांपेक्षा जास्त किमतीची तिकिटे रोखण्यात आरपीएफला यश आले आहे.

Posted On: 08 SEP 2020 7:41PM by PIB Mumbai

 

रेल्वे संरक्षण दल आरपीएफने देशव्यापी तपासणीत रेल्वे आरक्षणाच्या पुष्टीसाठी वापरल्या जाणार्‍या रिअल मॅंगोनावाच्या बेकायदेशीर सॉफ्टवेअरचे कामकाज खंडित केले आहे.

प्रवासी सेवा पुन्हा सुरू केल्यावर अनधिकृत तिकीट विक्रीत वाढ होण्याची भीती लक्षात घेता काळाबाजार करणाऱ्यांविरोधात भारतीय रेल्वेच्या रेल्वे संरक्षण दलाने (आरपीएफ) जोरदार कारवाई सुरू केली. आरपीएफच्या फील्ड युनिट्सने 09.08.2020 रोजी तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्यांविरोधात केलेल्या कारवाईत "रेअर मँगो" (नंतर त्याचे नाव बदलून रिअल मॅंगोठेवण्यात आले) हे बेकायदेशीर सॉफ्टवेअर उघडकीस आणले. उत्तर मध्य रेल्वे (एनसीआर), पूर्व रेल्वे (ईआर) आणि पश्चिम रेल्वे (डब्ल्यूआर) च्या आरपीएफ तुकड्यांनी काही संशयितांना पकडले आणि रेअर मँगो / रियल मॅंगो सॉफ्टवेअरची कार्यवाही समजून घेण्याची व उलगडण्याची प्रक्रिया सुरू केली. बेकायदेशीर सॉफ्टवेअरचे काम पद्धतशीरपणे उलगडण्याच्या वेळी पुढील गोष्टी आढळून आल्या :-

1. रियल मॅंगो सॉफ्टवेअर व्ही 3 आणि व्ही 2 कॅप्चा वगळून पुढे जाते.

2. हे मोबाईल अ‍ॅपच्या मदतीने बँक ओटीपीचे संकलन करते आणि त्यास स्वयंचलितपणे आवश्यक रूपात फीड करते.

3. हे सॉफ्टवेअर प्रवाश्यांचे तपशील आणि भरणा तपशील स्वयंचलितपणे भरते.

4. विविध आयआरसीटीसी आयडीद्वारे हे सॉफ्टवेअर आयआरसीटीसीच्या संकेतस्थळावर लॉग इन करते.

5. बेकायदेशीर सॉफ्टवेअरची विक्री ही पाच टप्प्यातील रचनेनुसार केली जाते: सिस्टम अ‍ॅडमीन आणि त्याची टीम, मावेन्स, सुपर विक्रेते, विक्रेते आणि दलाल.

6. सिस्टीम अ‍ॅडमिनला बिटकॉइन्समध्ये पैसे मिळतात.

आत्तापर्यंत या अवैध सॉफ्टवेअरच्या संचालनात किंग पिन (ही प्रणाली विकसित करणारा) आणि मुख्य व्यवस्थापकांसह 50 गुन्हेगारांना पकडण्यात आणि 5 लाख रुपयांहून अधिक किमतीची तिकिटे रोखण्यात आरपीएफच्या फील्ड युनिट्सना यश आले आहे. पश्चिम बंगालमधून अवैध सॉफ्टवेअरच्या पाच प्रमुख चालकांना अटक करण्यात आली आहे. हे सॉफ्टवेअर आता पूर्णपणे निकामी झाले आहे.

डिसेंबर 2019 ते मार्च 2020 दरम्यान आरपीएफच्या एकत्रित देशव्यापी कारवाईमुळे एएनएमएस / रेड मिर्ची / ब्लॅक टीएस, टिकटोक, आय-बॉल, रेड बुल, मॅक , एन-जीईटी, सायकल, स्टार-व्ही 2 इत्यादी अनेक बेकायदेशीर सॉफ्टवेअर निकामी करण्यात आणि त्यामध्ये व्यस्त 104 गुन्हेगारांना अटक करण्यात यश आले आहे. आरपीएफने दिलेल्या माहितीद्वारे रेल्वे माहिती प्रणाली केंद्र सीआरआयएस / भारतीय रेल्वे खानपान आणिपर्यटन महामंडळ आयआरसीटीसीला पीआरएस प्रणालीतील सुरक्षा वैशिष्ट्यांना बळकट करण्यास मदत केली ज्यामुळे त्यावेळेस सॉफ्टवेअरचे कार्य निकामी करता आले.

 

B.Gokhale/V.Joshi/P.Kor

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1652430) Visitor Counter : 178