वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय

पीयुष गोयल यांनी एसीएमए वार्षिक सत्राला संबोधित केले


सहयोग, सहकार्य आणि वचनबद्धता- याचा विकास आणि स्पर्धेसाठी अनुसरण करण्याचे मंत्र्यांचे एसीएमएला आवाहन

प्रविष्टि तिथि: 05 SEP 2020 10:42PM by PIB Mumbai

 

केंद्रीय उद्योग आणि वाणिज्य, रेल्वेमंत्री पीयुष गोयल यांनी भारतीय ऑटोमोटिव्ह घटक उत्पादकांना सहयोग, सहकार्य आणि वचनबद्धता, आणि जगाशी स्पर्धा करण्याचे तसेच विश्वासाने पुढे जाण्याचे आवाहन केले. त्यांनी आज ऑटोमोटिव्ह कॉम्पोनन्ट मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनच्या (ACMA) 60 व्या वार्षिक संमेलनाला संबोधित केले. गेल्या काही वर्षांत उत्पादकांनी चांगला विकास केला आहे आणि जागतिक स्पर्धेसाठी स्वतःला तयार केले आहे, असे गोयल म्हणाले. 

उद्योग भविष्यासाठी तयार आहे आणि कोविडनंतरच्या परिस्थितीत विजयी होणारच, असे मंत्री म्हणाले. संकटाच्या काळातच आपल्या संस्थांमधून उत्तम प्रतीचे निकाल मिळतात. व्यापार प्रोत्साहन माध्यमातून, तंत्रज्ञान अद्ययावत करुन, गुणवत्ता वाढ करुन, माहितीचे संकलन आणि प्रसारित करण्याचे उपाय यासाठी एसीएमए नवीन नॉर्मलच्या अग्रस्थानी राहू शकतो, असे गोयल पुढे म्हणाले.

पीयुष गोयल म्हणाले, अवघ्या देशाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आत्मनिर्भर भारतआवाहनाचा स्वीकार केला आहे. यामुळे भारत उर्वरित जगाशी मजबूतीने आणि विश्वासाने जोडला जाईल. ते म्हणाले लवचिक जागतिक पुरवठा साखळीत विश्वासू भागीदारांची आवश्यकता आहे. आपण आपली जागतिक पोहोच वाढवू. आपल्याला व्यवसाय वाढवण्याची आणि स्पर्धात्मक दरांवर खरोखर उच्च-गुणवत्तेची उत्पादने उपलब्ध करुन देण्याचा आणि विश्वासू भागीदार होण्याच्या प्रचंड संधी दिसत आहेत, असे गोयल म्हणाले.

भारतीय अर्थव्यवस्थेतील सकारात्मक बदलांबाबत बोलताना ते म्हणाले, रेल्वेमध्ये गेल्या महिन्यात आपण गेल्या वर्षीच्या तुलनेत 4 टक्के मालवाहूतक वाढवण्यात यशस्वी झालो आहोत. ट्रॅक्टर विक्रीत सुधारणा झाली आहे, दुचाकी आणि तीन-चाकी विक्रीतही चांगली वाढ दिसत आहे. आपल्या चमकदार भविष्याकडे सकारात्मकतेने वाटचाल करण्याची ही वेळ आहे. आशा आणि विश्वासाने भविष्याकडे पाहण्याची वेळ आहे.

गोयल पुढे म्हणाले, उत्पादकता वाढीसाठी उपाययोजना केल्या पाहिजेत आणि ग्राहकांच्या प्राधान्यांचे पुरवठादार होण्यासाठी उत्तम उपाययोजना केल्या पाहिजेत. ते म्हणाले की जर उद्योगाने परवडणारी क्षमता आणि अधिक आकर्षक मार्ग शोधले तर आफ्टरमार्केट व्यवसाय एसीएमएसाठी बर्‍याच संधी मिळवून देईल. गुणवत्तेकडे चिकाटीने आणि प्रमाणात काम केल्यास हा उद्योग निश्चितच निर्यातीसाठी अधिक स्पर्धात्मक होईल. वाहन उद्योगासाठी नाविन्यपूर्ण अर्थसहाय्य देण्याची मागणी त्यांनी केली.

****

B.Gokhale/S.Thakur/P.Kor

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(रिलीज़ आईडी: 1651682) आगंतुक पटल : 132
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Manipuri , Punjabi , Tamil , Telugu