सामाजिक न्याय आणि सबलीकरण मंत्रालय
मानसिक आरोग्य विषयक किरण या चोवीस तास सुरु राहणाऱ्या निःशुल्क हेल्पलाईनची (1800-599-0019) केंद्रीय मंत्री थावरचंद गेहलोत 7 सप्टेंबर 2020 ला सुरवात करणार
Posted On:
04 SEP 2020 10:40PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 4 सप्टेंबर 2020
केंद्रीय सामाजिक न्याय आणि सबलीकरण मंत्री थावरचंद गेहलोत, ‘किरण’ या मानसिक आरोग्य विषयक निःशुल्क हेल्पलाईनची (1800-599-0019) 7 सप्टेंबर 2020 ला आभासी पद्धतीने सुरवात करणारआहेत. मानसिक आजार असलेल्या व्यक्तींच्या मदतीसाठी दिव्यांगांच्या सबलीकरणासाठीचा विभाग, सामाजिक न्याय आणि सबलीकरण मंत्रालयाने ही हेल्पलाईन विकसित केली आहेमानसिक आजाराच्या वाढत्या घटनांच्या विशेषकरून कोविड-19 च्या अभूतपूर्व महामारीच्या पार्श्वभूमीवर याचे विशेष महत्व आहे.
लवकर निदान, प्रथमोपचार, मानसिक आधार, आघातांचे व्यवस्थापन, मानसिक आरोग्य,सकारात्मक वर्तनाला प्रोत्साहन, मानसिक पेच प्रसंगांचे व्यवस्थापन यासाठी मानसिक आरोग्य पुनर्वसन सेवा ही हेल्पलाईन पुरवणार आहे. कोणतीही व्यक्ती, कुटुंब, स्वयंसेवी संस्था, पालक संघटना, व्यावसायिक संघटना, पुनर्वसन संस्था,रुग्णालये अशा मदतीची गरज असलेल्या देशभरातल्या कोणालाही पहिल्या टप्याचा सल्ला आणि समुपदेशन पुरवण्याचे महत्वाचे काम ही हेल्प लाईन काम करेल.
हेल्प लाईन सुरु करण्याच्या कार्यक्रमाच्या लाईव्ह वेब कास्टसाठी खालील लिंक वर क्लिक करा: https://webcast.gov.in/msje/
* * *
B.Gokhale/N.Chitale/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1651464)
Visitor Counter : 356