कृषी मंत्रालय

4.09.2020 पर्यंत विक्रमी 1095.38 लाख हेक्टर क्षेत्रावर खरीप पिकाच्या पेरण्या


सरकारकडून बियाणे, कीटकनाशके, खते, यंत्रसामग्री आणि पतपुरवठा वेळेवर उपलब्ध झाल्याने लॉकडाऊन काळातही मोठ्या क्षेत्रावर पेरणी शक्य- कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर

Posted On: 04 SEP 2020 6:20PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 4 सप्‍टेंबर 2020


चालू खरीप हंगामात विक्रमी 1095.38 लाख हेक्टर क्षेत्रावर खरीप पिकाच्या पेरण्या झाल्या आहेत. भाताची पेरणी अद्याप सुरु असून दली डाळी, भरड धान्य, बाजरी, तेलबिया यांची पेरणी जवळपास पूर्ण होत आली आहे. आतापर्यंत खरीप पिकाच्या पेरणी क्षेत्राच्या प्रगतीवर कोविड-19 चा परिणाम झालेला नाही. 

सरकारकडून बियाणे, कीटकनाशके, खते, यंत्रसामग्री आणि पतपुरवठा वेळेवर उपलब्ध झाल्याने महामारीमुळे लागू झालेल्या  लॉकडाऊन काळातही मोठ्या क्षेत्रावर पेरणी शक्य झाल्याचे केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी म्हटले आहे. सरकारच्या योजना आणि मिशन कार्यक्रमांच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी कृषी मंत्रालय आणि राज्य सरकारांचे  सर्वतोपरी प्रयत्न सुरु आहेत. वेळेवर कृती, तंत्रज्ञानाचा स्वीकार आणि सरकारी योजनांचा लाभ घेण्याचे श्रेय त्यांनी शेतकऱ्याना दिले. खरीप हंगामाच्या पेरणीसाठीची अंतिम आकडेवारी 2 ऑक्टोबर 2020 ला बंद होईल. खरीप पिकांच्या पेरणीच्या  क्षेत्राची स्थिती  याप्रमाणे- 

  • तांदूळ : 396.18 लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी, गेल्या वर्षीच्या याच काळात 365.92 लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी, म्हणजेच पेरणी क्षेत्रात 8.27%. वाढ. 
  • डाळी : 136.79 लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी, गेल्या वर्षीच्या याच काळात 130.68 लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी, म्हणजेच पेरणी क्षेत्रात 4.67%.वाढ. 
  • भरड धान्य : 179.36 लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी, गेल्या वर्षीच्या याच काळात 176.25 लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी, म्हणजेच पेरणी क्षेत्रात 1.77%,वाढ. 
  • तेलबिया : 194.75  लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी, गेल्या वर्षीच्या याच काळात 174.00 लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी, म्हणजेच पेरणी क्षेत्रात 11.93%,वाढ. 
  • ऊस : 52.38 लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी, गेल्या वर्षीच्या याच काळात 51.71 लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी, म्हणजेच पेरणी क्षेत्रात 1.30%वाढ. 
  • कापूस : 128.95 लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी, गेल्या वर्षीच्या याच काळात 124.90 लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी, म्हणजेच पेरणी क्षेत्रात 3.24%वाढ. 

केंद्रीय जल आयोगाकडून मिळालेल्या माहिती नुसार 03.09.2020 रोजी देशातल्या 123 धरणात, गेल्या वर्षीच्या याच काळाच्या 104 % तर गेल्या दहा वर्षाच्या सरासरी जलसाठ्याच्या 120 % जलसाठा उपलब्ध आहे. 

04.09.2020 पर्यंतच्या खरीप पिकाच्या पेरणी क्षेत्राच्या तपशिलासाठी इथे क्लिक करा

 

* * *

B.Gokhale/N.Chitale/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1651366) Visitor Counter : 230