जलशक्ती मंत्रालय
जलशक्ती मंत्रालयाकडून जल नायक स्पर्धा 2.0
Posted On:
02 SEP 2020 8:45PM by PIB Mumbai
जलसंवर्धन ही जनचळवळ व्हावी आणि देशात जलचेतना मजबूत व्हावी हे जलशक्ती मंत्रालयाचे मुख्य ध्येय आहे. या ध्येयाला अनुसरुनच, जलसंवर्धन विभाग, नदी विकास आणि गंगा पुनरुत्थान मंत्रालय, जलशक्ती मंत्रालयाने ‘वॉटर हिरोज-शेअर युअर स्टोरीज’ स्पर्धा 1 सप्टेंबर 2020 पासून सुरु केली आहे. जलसंवर्धन आणि व्यवस्थापन या महत्त्वाच्या विषयांसह लोकांमध्ये पोहोचणे, हा यामागचा उद्देश आहे.
वॉटर हिरोज स्पर्धेच्या निमित्ताने, देशभरात जलसंवर्धनासाठीच्या चांगल्या सवयींना प्रोत्साहन देणे आणि संकलन करण्याची आशा आहे. तसेच या क्षेत्रात अधिक परिवर्तनशील प्रयत्नासाठी देशभर अशा प्रयत्नांची माहिती प्रसारीत करण्यात येणार आहे. पुरस्कारासाठी दर महिन्याला (सप्टेंबर 2020 पासून) प्रवेशिका आमंत्रित केल्या जातील. दर महिन्याला जास्तीत जास्त 10 प्रवेशिकांचा पुरस्कारासाठी विचार केला जाईल. निवडलेल्या प्रवेशिकांना प्रत्येकी 10,000 रुपये आणि प्रमाणपत्र प्रदान करण्यात येईल.
या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी, सहभिगातांना आपली जलसंवर्धनासंबंधीची यशोगाथा 1-5 मिनिटाच्या व्हिडीओच्या माध्यमातून (सोबत 300 शब्दांचे टिपण आणि छायाचित्र या सह) जलस्रोत संवर्धन आणि व्यवस्थापनातील योगदान याविषयी माहिती द्यावी लागणार आहे.
सहभागितांनी आपले व्हिडीओ (युट्यूब लिंकसह) www.mygov.in या संकेतस्थळावर सामायिक करावे. या पोर्टल व्यतिरिक्त, प्रवेशिका waterheroes.cgwb[at]gmail[dot]com या ई-मेलवर पाठवता येतील. सहभागितांना सूचना करण्यात येते की, त्यांनी पूर्ण व्हिडीओ अपलोड न करता युट्यूब लिंक सामायिक करावी. 31 ऑगस्ट 2021 रोजी स्पर्धेचा समारोप होईल.
***
M.Chopade/S.Thakur/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1650784)
Visitor Counter : 185