संरक्षण मंत्रालय

हवाई दल क्रीडा नियंत्रण मंडळाला ‘राष्ट्रीय खेल प्रोत्साहन पुरस्कार 2020’ प्रदान

Posted On: 31 AUG 2020 9:47PM by PIB Mumbai

नवी  दिल्ली , 31 ऑगस्ट 2020

हवाई दल क्रीडा नियंत्रण मंडळाला, क्रीडापटूंना त्यांच्या क्रीडा प्रकारात उत्कृष्ट कामगिरी आणि क्रीडा विकासासाठी कल्याणकारी उपायांची अंमलबजावणी करण्यात उल्लेखनीय योगदानाबद्दल ‘राष्ट्रीय खेल प्रोत्साहन पुरस्कार 2020’ प्रदान करण्यात आला आहे. हा पुरस्कार देशात तसेच हवाई दलात क्रीडा प्रोत्साहन आणि चालना देण्यासाठी सतत प्रयत्नशील असल्याबद्दल प्रदान केला आहे. एअर मार्शल एमएसजी मेनन, एअर ऑफिसर-इन-चार्ज प्रशासन आणि अध्यक्ष, हवाई दल क्रीडा नियंत्रण मंडळ यांनी राष्ट्रपतींच्या हस्ते 29 ऑगस्ट रोजी विज्ञान भवन येथे ऑनलाईन आयोजित केलेल्य सोहळ्यात पुरस्कार स्वीकारला.

हवाई दल क्रीडा नियंत्रण मंडळ (AFSCB) ही हवाई दल आणि सेवा-अंतर्गत स्तरावरील क्रीडा स्पर्धांचे नियोजन आणि आयोजन करणारी शिखर संस्था आहे. एएफएससीबीच्या निरंतर प्रयत्नांमुळेच भारतीय हवाई दलाच्या टीमचा दर्जा सुधारला आहे आणि हवाई दलातील क्रीडापटूंना करिअरमध्ये प्रगती करण्यासाठी मार्गदर्शन केले जात आहे.

आरंभिक पातळीवर खेळांना चालना दिल्यास क्रीडा संस्कृती निर्माण होते आणि तरुण हवाई योद्ध्यांना जीवनाचा एक भाग म्हणून खेळांकडे पाहण्याची प्रेरणा मिळते. 

 

M.Chopade /S.Thakur/P.Malandkar

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1650230) Visitor Counter : 160