उपराष्ट्रपती कार्यालय
उपराष्ट्रपतींनी प्रणव मुखर्जी यांच्या निधनावर तीव्र शोक व्यक्त केला
ग्रहण केलेल्या प्रत्येक पदाला त्यांनी सन्मान आणि प्रतिष्ठा प्राप्त करुन दिली
त्यांच्या निधनाने, भारताने सर्वोत्कृष्ट नेत्यांपैकी एकाला गमावले आहे- उपराष्ट्रपती
Posted On:
31 AUG 2020 8:32PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 31 ऑगस्ट 2020
उपराष्ट्रपती एम. वेंकैया नायडू यांनी आज माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचे निधन झाल्याबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे. आपल्या संदेशात ते म्हणाले, प्रणव मुखर्जी हे मुरब्बी नेते होते आणि भारताचे विख्यात सुपूत्र होते, ज्यांनी ग्रहण केलेल्या प्रत्येक पदाला प्रतिष्ठा आणि सन्मान प्राप्त करुन दिला. त्यांच्या निधनाने, भारताने सर्वोत्कृष्ट नेत्यांपैकी एक नेता गमावला आहे, असे नायडू म्हणाले.
उपराष्ट्रपतींचा संदेश –
माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या निधनाने तीव्र शोक झाला आहे. ते मुरब्बी नेते होते आणि भारताचे विख्यात सुपूत्र होते, ज्यांनी सामान्य पातळीपासून सुरुवात करुन आपल्या कष्टाने, शिस्तीने आणि त्यागाने देशाचे सर्वोच्च पद प्राप्त केले.
प्रणव मुखर्जी यांनी आपल्या दीर्घ आणि प्रतिष्ठित सार्वजनिक जीवनात ग्रहण केलेल्या प्रत्येक पदाला प्रतिष्ठा आणि सन्मान प्राप्त करुन दिला. ते प्रशासकीय कौशल्य आणि भारतीय संसदीय पद्धतीचे उत्तम जाणकार होते, त्यांनी अर्थमंत्री, संरक्षणमंत्री, परराष्ट्र व्यवहार मंत्री आणि नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष अशी अनेक महत्वाची पदे भूषवली. राष्ट्रपती पदावर असताना त्यांनी जनतेला राष्ट्रपती भवनात नाविन्यपूर्ण कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित केले.
ते संसदीय प्रक्रिया, समकालीन राजकीय आणि इतर विषयांसंदर्भातील विश्वकोश होते आणि त्यांच्या अभ्यासपूर्ण ज्ञानासाठी परिचित होते. ते एक उत्कृष्ट संसद सदस्य होते आणि आपल्या वक्तृत्व शैलीसाठी ओळखले जात होते. त्यांची विलक्षण स्मरणशक्ती आणि मुद्यांचे त्वरित आकलन करण्याची क्षमता महान होती. लोकशाही अधिक मजबूत करण्यासाठी आणि विविध संस्थांना बळकटी प्रदान करण्यात त्यांनी प्रचंड रस घेतला. मतैक्य असणाऱ्या अनेक महान व्यक्तींपैकी ते एक होते आणि राजकीय पक्षभेद बाजूला सारुन प्रत्येकाला भेटत असत.
त्यांच्या निधनाने, भारताने आपल्या सर्वोत्कृष्ट नेत्यांपैकी एक असलेल्या नेत्याला गमावले आहे. शोकाकुल कुटुंबीयांच्या दुःखात मी सहभागी आहे आणि त्यांना या प्रचंड हानीतून सावरण्यासाठी सामर्थ्य आणि धैर्य प्रदान करण्याची परमेश्वराकडे मागणी करतो.
M.Chopade /S.Thakur/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1650140)
Visitor Counter : 214