कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन मंत्रालय
गाव आणि खेड्यातील उमेदवारांना भरती प्रक्रियेत समविष्ट करून घेण्यात भरती क्षेत्रातील ‘राष्ट्रीय भरती संस्था’हा सरकारचा निर्णय कलाटणी देणारा ठरेल: जितेंद्र सिंह
Posted On:
31 AUG 2020 6:04PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 31 ऑगस्ट 2020
पत्र सूचना कार्यालय, कोलकता यांनी आज आयोजित केलेल्या भरती व्यवस्थेत बदल घडवून आणण्यासाठी आणि तरुणांना योग्य नोकरी मिळविण्याच्या आकांक्षा पूर्ततेमध्ये मदत करण्यासाठी राष्ट्रीय भरती संस्था, या विषयावरील वेबिनारमध्ये तज्ञांनी आपली मते व्यक्त केली. उद्योगजगत, सरकारी क्षेत्रातील तज्ञ तसेच शैक्षणिक अभ्यासकांनी भरती क्षेत्र आणि धोरणात्मक दृष्टीकोनातून राष्ट्रीय भरती संस्थेची संभाव्य शक्यता आणि भुमिकेबाबत यावेळी चर्चा केली.
याप्रसंगी, ईशान्य विभाग विकास मंत्रालयाचे केंद्रीय राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) आणि पंतप्रधान कार्यालय, कार्मिक, सार्वजनिक तक्रारी व निवृत्तीवेतन, अणु ऊर्जा विभाग आणि अवकाश विभाग, राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह म्हणाले की, या निर्णयामुळे भरती क्षेत्राला एक वेगळीच कलाटणी मिळेल आणि खेड्यात आणि गावांमध्ये भरतीचे प्रमाण वाढेल. ते म्हणाले की उमेदवारांना नोकरीच्या संधी देणे हा एक परिवर्तनशील प्रयत्न आहे ज्यामुळे तरुणांचे जीवनमान सुकर होईल. त्यांनी विद्यार्थी भरती प्रक्रियेवर आणि भरती क्षेत्रातील उत्तम पद्धतींवर भर दिला. डॉ. जितेंद्रसिंग म्हणाले की, राष्ट्रीय भरती संस्था ही भरती प्रणालीत आदर्श बदल घडवून आणेल आणि योग्य नोकरी मिळविण्याच्या तरुणांच्या आकांक्षा पूर्ण करू शकेल. ते म्हणाले की ही केवळ प्रशासकीय सुधारणाच नाही तर सामाजिक-आर्थिक सुधारणा देखील आहेत.
प्रेमपाल शर्मा, माजी कार्यकारी संचालक आणि सहसचिव, रेल्वे मंडळ, रेल्वे मंत्रालय, यांनी आकांक्षी जिल्ह्यातील परीक्षांच्या पायाभूत सुविधांमधील आव्हानांचा उल्लेख केला. ग्रामीण भागातील उमेदवारांमध्ये नोकरीच्या क्षेत्राबाबत जागरूकता निर्माण करणे आणि प्रोत्साहित करणे ही या उपक्रमाची सकारात्मक बाब आहे आणि उमेदवार एकदाच सामान्य पात्रता चाचणी देऊन उच्च स्तरावरील परीक्षेसाठी कोणत्याही एका किंवा सर्व भरती संस्थेमध्ये अर्ज करू शकेल.
एससीसीचे माजी अध्यक्ष ब्रजराज शर्मा, नोकरी निवड, भरती आणि नोकरीच्या संधी याचा एकत्रित विचार केला पाहिजे असे सांगत राष्ट्रीय भरती संस्थेच्या निर्णयाबद्दल आशावाद व्यक्त केला. ते म्हणाले की भरतीच्या मूल्य शृंखलेतील सर्वांसाठीच अर्थात मग ते नोकरी शोधणारे, भरती संस्था असोत किंवा मनुष्यबळ कर्मचारी असोत सर्वांसाठीच ही एक विजयाची स्थिती आहे. कर्मचारी निवड आयोग, रेल्वे भरती मंडळ आणि बँकिंग कार्मिक निवड संस्था या तीन संस्थांमध्ये सामान्य पात्रता चाचणी घेऊन भरती केली जाईल असे ते म्हणाले. 117 आकांक्षी जिल्ह्यात परीक्षांची पायाभूत सुविधा विकसित करण्यावर त्याचा विशेष भर असेल. एकाच अनेक परीक्षा देता येणे यासारखे अनेक फायदे विद्यार्थ्यांसाठी आहेत आणि जास्तीत जास्त महिला उमेदवार, दिव्यांग आणि ग्रामीण भागातील उमेदवारांना सरकारी नोकरीसाठी अर्ज करण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात परीक्षा घेतली जाईल.
रेल्वे मंत्रालयाच्या औद्योगिक संबंधाचे माजी सल्लागार ए. निगम म्हणाले की, सरकारने नुकत्याच घेतलेल्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 च्या अनुषंगाने हा निर्णय घेण्यात आला आहे. नोकरी शोधणाऱ्यासाठी शालेय स्तरावरील व्यावसायिक प्रशिक्षण ही एक मोलाची भर आहे आणि एखाद्या विशिष्ट नोकरीसाठी अर्ज करताना उमेदवाराला त्यांची पसंतीची नोकरी शोधण्यात याची मदत होईल, असे ते म्हणाले.
राष्ट्रीय भरती संस्थेबाबत सकारात्मक प्रतिक्रिया व्यक्त करताना, एआयबीओसीचे सरचिटणीस सौम्या दत्ता आणि पूर्व-डीजीएम एसबीआय आणि मंडळ विकास अधिकारी, ईशान्य पूर्व विभाग, प्रभारी एचआर आशिष बिश्वास म्हणाले की, बँकिंग क्षेत्राच्या विशिष्ट प्रोफाईलसाठी प्राथमिक स्तरावरील एका चाचणी उपयुक्त ठरेल आणि त्यानंतर द्वितीय श्रेणी आणि तृतीय श्रेणी परीक्षेत विशिष्ट नोकरी आणि प्रोफाइलसाठी योग्य उमेदवार नियुक्त करण्यात यामुळे मदत होईल. श्री बिश्वास म्हणाले की, विविध सरकारी नोकरीसाठी योग्य वेळी योग्य उमेदवारांची निवड करण्यासाठी युवकांची क्षमता आणि त्यांच्या कौशल्यानुसार योग्यतेने नोकरी मिळविण्याकरिता गरजा भागविण्यास एनआरएची भूमिका महत्त्वपूर्ण आहे.
M.Iyengar/S.Mhatre/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1650039)
Visitor Counter : 203