अर्थ मंत्रालय

जीएसटीआर -2A मधील आयातीसंदर्भातील माहिती

Posted On: 29 AUG 2020 7:35PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 29 ऑगस्‍ट 2020

 

जीएसटीआर-2A ह्या अर्जात दोन नवे रकाने घातले असून त्यात परदेशातून आयात केलेल्या वस्तूंसाठी एक आणि विशेष आर्थिक क्षेत्रात आवक पुरवठा करणाऱ्या घटकांसाठी अथवा विकासकांसाठी एक (SEZunits and SEZ Developers) असे असतील. आईसगेट सिस्टीम (सीमाशुल्क) विभागाकडून करदाते आता त्यांच्या बिलातील जीएसटी सिस्टीम (GSTN) मधे किती शुल्क भरले गेले, ते पाहू शकतील. आता सुरू केलेली पध्दत ही चाचणीदाखल केली असून त्यामुळे कार्यक्षमता वाढीस लागेल  तसेच  करदात्यांकडून त्याबाबत लगेच अभिप्राय मागविला जाईल.

सध्या अस्तित्वात असलेली पध्दत 6 ऑगस्ट 2020 पर्यंतची माहिती दाखवत आहे. त्याशिवाय  ह्या सिस्टीम मधे सध्या करदात्यांना आपल्या बिलामधील आयातीबद्दलची असंगणकीय जागेवरून भरलेली माहिती (non EDI ports) दाखवत नसून, आयातीबद्दलची कुरिअर द्वारे वा टपाल कार्यालयातून भरलेली माहिती देखील दिसून येत नाही. लवकरच ही सुविधा सुरु केली जाईल.

यामधे काही बदल केला गेल्यास त्याबाबत माहिती दिली जाईल.

करदात्यांना विनंती करण्यात येत आहे, की त्यांनी स्वयंस्फूर्तीने  पोर्टल वरून अभिप्राय नोंदवावा. (https://selfservice.gstsystem.in/)


* * *

M.Jaitely/S.Patgaonkar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1649602) Visitor Counter : 190