गृह मंत्रालय
भविष्यात जागतिक राजकीय पटलावर अर्थव्यवस्था आणि आपत्ती जोखीम व्यवस्थापन यामध्ये भारत आघाडीची भूमिका बजावेल- गृह राज्य मंत्री नित्यानंद राय
आपत्ती जोखीम व्यवस्थापना संदर्भात पंतप्रधानांच्या कार्यक्रमाला प्रोत्साहन देणाऱ्या तीन दिवसांच्या आंतरराष्ट्रीय कार्यक्रमाच्या समारोप सत्राला राय यांनी केले संबोधित
Posted On:
29 AUG 2020 12:57PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 29 ऑगस्ट 2020
भविष्यातल्या जागतिक राजकीय पटलावर अर्थव्यवस्था आणि आपत्ती जोखीम व्यवस्थापनाच्या दृष्टीकोनातून भारत आघाडीची भूमिका बजावेल असे केंद्रीय गृह राज्य मंत्री नित्यानंद राय यांनी म्हटले आहे. आपत्ती जोखीम व्यवस्थापनात दहा सूत्री कार्यक्रमाच्या माध्यमातून पंतप्रधानांनी दाखवलेली दूरदृष्टी आणि उत्साह यांना पुष्टी देत यातल्या 6 क्रमांकाच्या पैलू बरोबरच विज्ञान आणि तंत्रज्ञानाची सांगड घालणाऱ्या पाचव्या क्रमांकाच्या पैलूमुळे आपत्ती व्यवस्थापना संदर्भात काम करण्यासाठी विद्यापीठांचे जाळे विकसित होत असल्याचे सांगून त्यातून हवामान जोखीम व्यवस्थापनाच्या आवश्यकताही पूर्ण होत असल्याचे ते म्हणाले.
आंतरराष्ट्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान परिषदेच्या समारोप कार्यक्रमात अध्यक्ष स्थानावरून ते बोलत होते. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन संस्था (एनआयडीएम) आणि विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग (डीएसटी) यांनी 27 ऑगस्ट 2020ला व्हिडीओ कॉन्फरन्सिंग द्वारे हा कार्यक्रम आयोजित केला होता. आपल्या देशातल्या विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातल्या प्रतिभेवर विश्वास व्यक्त करतानाच आपल्या देशातल्या अगदी दुर्गम भागातल्या आणि प्रत्येक गरजू व्यक्तीपर्यंत पोहोचण्याचे विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाचे उद्दिष्ट असल्याचे त्यांनी सांगितले. तीन दिवसांच्या या परिषदेचे फलित आणि शिफारसी येत्या काळात वास्तवात साकारल्या जातील असे ते त्यांनी सांगितले.
या परिषदेच्या उद्घाटन सत्राला केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ हर्ष वर्धन यांनी 25 ऑगस्ट 2020 ला संबोधित केले होते. हवामान अनुकूल नियोजन प्रकल्पाअंतर्गत आयोजित केलेल्या या आंतरराष्ट्रीय कार्यक्रमासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाचेही सहकार्य लाभले.
देशातले तज्ञ, सरकारी अधिकारी, विज्ञान आणि तंत्रज्ञानक्षेत्रातले दिग्गज, धोरणकर्ते, अंमलबजावणी करणारे यांच्यासह 10 देशातले मान्यवरही या कार्यक्रमाला उपस्थित होते.
* * *
M.Iyengar/N.Chitale/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1649455)
Visitor Counter : 141