युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त राष्ट्रीय क्रीडा आणि साहस पुरस्कार 2020 उद्या आभासी पद्धतीने प्रदान करण्यात येणार
प्रविष्टि तिथि:
28 AUG 2020 9:39PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 28 ऑगस्ट 2020
राष्ट्रपती रामनाथ कोविंद उद्या राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त राष्ट्रीय क्रीडा आणि साहस पुरस्कार 2020 आभासी पद्धतीने प्रदान करणार आहेत. केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री किरेन रीजीजू, भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष नरेंद्र ध्रुव बत्रा आणि इतर मान्यवर उद्या विज्ञान भवन, नवी दिल्ली येथे होणाऱ्या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत.
या सोहळ्यासाठी पुरस्कार विजेते बेंगळुरु, पुणे, सोनीपत, चंदीगढ, कोलकाता, लखनऊ, दिल्ली, मुंबई, भोपाळ, हैदराबाद आणि इटानगर येथून उपस्थित राहणार आहेत. सोहळ्याला 29 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता सुरुवात होईल. दूरदर्शनवरुन याचे थेट प्रक्षेपण करण्यात येईल तसेच https://webcast.gov.in/myas/sportsawards/.या संकेतस्थळावरही थेट प्रक्षेपण पाहता येईल.
क्रीडा क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीसाठी दरवर्षी क्रीडा पुरस्कार दिले जातात. राजीव गांधी खेल रत्न पुरस्कार गेल्या चार वर्षातील सर्वोत्कृष्ट कामगिरीसाठी प्रदान केला जातो, अर्जुन पुरस्कार सुद्धा चार वर्षे सतत उत्कृष्ट कामगिरीसाठी प्रदान केला जातो, तर द्रोणाचार्य पुरस्कार विविध आंतरराष्ट्रीय स्पर्धा प्रशिक्षकांना दिला जातो. धान्यचंद पुरस्कार क्रीडा विकासातील आजीवन कामगिरीसाठी आणि राष्ट्रीय खेल प्रोत्साहन पुरस्कार क्रीडा प्रोत्साहन आणि विकासाच्या क्षेत्रात महत्त्वपूर्ण भूमिका बजावलेल्या कॉर्पोरेट संस्थांना (खासगी आणि सार्वजनिक क्षेत्रातील) दिला जातो. आंतर-विद्यापीठ स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट कामगिरीसाठी मौलाना आझाद कलाम चषक प्रदान केला जातो. यासह, तेन्झिंग नॉर्गे नॅशनल अॅडव्हेंचर अवॉर्ड देऊन देशातील लोकांमध्ये साहसीपणाची भावना जोपासली जाते. प्रथमच राष्ट्रीय क्रीडा आणि साहस पुरस्कार 2020, 29 ऑगस्ट रोजी आभासी पद्धतीने साजरा करण्यात येत आहे.
साथीच्या संक्रमण परिस्थितीत आभासी पद्धतीने पुरस्कार सोहळा आयोजित केल्याबद्दल खेळाडूंनी आनंद व्यक्त केला आहे.
दरवर्षी देशात 29 ऑगस्ट क्रीडा दिन म्हणून साजरा केला जातो. महान हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांच्या सन्मानार्थ क्रीडा दिन साजरा केला जातो. उद्य कार्यक्रमाची सुरुवात होण्यापूर्वी किरेन रिजीजू मेजर ध्यानचंद स्टेडिअम येथे जाऊन मेजर ध्यानचंद यांना आदरांजली अर्पण करणार आहेत.
G.Chippalkatti/S.Thakur/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1649385)
आगंतुक पटल : 241