ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक पुरवठा मंत्रालय

अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाच्या सचिवांच्या अध्यक्षतेखाली पीडीएस सुधारणेसंदर्भातील सक्षम गटाची बैठक


एफपीएस स्वयंचलन आणि एक राष्ट्र एक रेशनकार्ड योजनेचा आढावा

Posted On: 28 AUG 2020 8:35PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 28 ऑगस्ट 2020

अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाचे सचिव यांच्या अध्यक्षतेखाली आज पीडीएस सुधारणासंदर्भात पार पडलेल्या बैठकीला युआयडीएआयचे मुख्य कार्यकारी अधिकारी, एनआयसी महासंचालक, समितीचे सभासद असलेले चार राज्यांचे अन्न विभागाचे सचिव आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय आणि भारतीय अन्नधान्य महामंडळाच्या प्रतिनिधींची उपस्थिती होती. सार्वजनिक वितरण व्यवस्थेचे एकात्मिक व्यवस्थापन (IM-PDS) ज्या अंतर्गत ‘एक राष्ट्र एक रेशनकार्ड’ योजना देशभर राबवली जाणार आहे, यासंदर्भात आजच्या बैठकीत आढावा घेण्यात आला आणि विस्ताराला मंजूरी देण्यात आली.

आयएमपीडीएसअंतर्गत सुरू असलेली कामं तशीच सुरु ठेवणे आणि पुढे त्यांना बळकटी मिळावी या उद्देशाने मार्च 2021 नंतरही योजनेला मुदवाढ देण्यात येईल.

सक्षम गटाने एफपीएस स्वयंचलन, एक राष्ट्र एक रेशनकार्ड योजना, आधार निर्मिती/स्थलांतरीत लाभार्थ्यांना नोंदणीकृत करुन घेण्यासाठी आणि एक राष्ट्र एक रेशनकार्ड योजनेचा पूर्ण लाभ मिळवून देण्यासाठी मोबाईल अ‍ॅप्लिकेशनची निर्मिती याचाही आढावा घेतला.विभागाकडून एनएफएसए लाभार्थ्यांना एक राष्ट्र एक रेशनकार्ड योजनेचा लाभ मिळावा यासाठी विविध राज्ये/केंद्रशासित प्रदेशांमध्ये हेल्पलाईन क्रमांक सुरु करण्याचे नियोजन आहे.

आयएमपीडीएसच्या नियोजीत विस्तार कालावधीत राज्ये, केंद्रशासित प्रदेशांना अर्थसहाय्य केले जाईल.

 

M.Chopade/S.Thakur/P.Malandkar

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1649364) Visitor Counter : 225