आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

सीजीएचएसकडून ईसंजीवनीद्वारे दिल्लीमध्ये टेली कन्स्लटेशन सेवा सुरू

Posted On: 26 AUG 2020 2:50PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 26 ऑगस्‍ट 2020

 

सध्याची कोविड-19 महामारीची परिस्थिती लक्षात घेता जेष्ठ नागरिकांना सार्वजनिक ठिकाणी विशेषकरून आरोग्य सुविधा केंद्रांना भेट देणे योग्य नसल्याच्या पार्श्वभूमीवर वरिष्ठ नागरिकांसह विविध घटकांकडून, तज्ञ डॉक्टरांसमवेत टेली कन्स्लटेशन सेवा सुरु करावी अशी विनंती आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाला करण्यात येत होती. 

आरोग्य केंद्रांना प्रत्यक्ष भेट न देता आभासी माध्यमातून सीजीएचएस, केंद्रीय आरोग्य सेवा लाभार्थींना तज्ञ डॉक्टरांचा सल्ला लाभावा यासाठी सीजीएचएसने 25.8.2020पासून टेली कन्स्लटेशन सेवा सुरु केली आहे. सुरवातीला ही सेवा दिल्ली/एनसीआरमधल्या लाभार्थींना उपलब्ध राहील. कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी सकाळी 9 ते दुपारी 12 वाजेपर्यंत ई सेवा उपलब्ध असेल. सीजीएचएस टेली कन्स्लटेशन सेवा, आरोग्य मंत्रालयाच्या सध्याच्या ई संजीवनी मंचाचा वापर करत आहे. सुलभ वापरासाठी हा मंच लाभार्थीच्या आयडीशी जोडला गेला आहे. तज्ञ बाह्य रुग्ण विभागसेवेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थींना मोबाईल क्रमांकाचा उपयोग करत या मंचावर नोदणी करावी लागेल, पडताळणीसाठी ओटीपी निर्माण केला जाईल. या नंतर लाभार्थी  यंत्रणेत लॉग ऑन करू शकेल. त्यानंतर रुग्णाचा नोंदणी फॉर्म भरून टोकन साठी विनंती करायची असून आवश्यकता भासल्यास आरोग्य तपशील अप लोड करायचा आहे. 

रुग्णाला एसएमएस द्वारे रुग्ण ओळख क्रमांक आणि ऑन लाईन रांगेतला आपला क्रमांक देण्यात येईल. त्याचा क्रमांक आल्यावर कॉल नाऊ हे बटण कार्यान्वित होईल त्याचा वापर करत लाभार्थी तज्ञाशी सल्ला घेण्यासाठी व्हिडीओ कॉल सुरु करू शकेल. यानंतर ई प्रीस्क्रीप्शन दिले जाईल त्याच्या आधारे रुग्ण सीजीएचएस वेलनेस सेंटर कडून औषध घेऊ शकेल.  

ज्यांना तज्ञ सल्ल्याची आवश्यकता आहे मात्र कोविड-19 मुळे जे बाहेर जाऊ शकत नाहीट अशांसाठी सीजीएचएसची ही नवी टेली कन्स्लटेशन सेवा  सीजीएचएस लाभार्थीसाठी वरदान ठरणार आहे. खालील तज्ञ सेवा उपलब्ध राहतील – 

  1. औषध 
  2. अस्थिरोग तज्ञ 
  3. नेत्र
  4. नाक कान घसा 

नियमित ओपीडी सेवेसाठी लाभार्थी देशभरात कोणत्याही वेलनेस सेंटरद्वारे ओपीडी सेवा घेऊ शकतो, तरीही प्रत्येक सीजीएचएस लाभार्थी विशिष्ठ वेलनेस सेंटरशी जोडला गेला आहे. तज्ञाशी सल्लामसलत करण्यासाठी सीजीएचएस लाभार्थीला त्यांच्या वेलनेस सेंटरच्या वैद्यकीय अधिकाऱ्याकडून संदर्भ द्यावा लागेल.वरिष्ठ नागरिकांसाठी याची आवश्यकता नाही.

 

* * *

U.Ujgare/N.Chitale/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1648690) Visitor Counter : 243