संरक्षण मंत्रालय

भारतीय लष्कराने भविष्यातील संघर्षात लढाऊ तत्त्वज्ञानावर विनाशकारी तंत्रज्ञानाचा प्रभाव या विषयावर चर्चासत्राचे केले आयोजन

Posted On: 25 AUG 2020 9:47PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 25 ऑगस्ट 2020

युद्ध आणि विनाशकारी  तंत्रज्ञानाच्या नवीन क्षेत्राच्या उदयामुळे युद्धात आमूलाग्र बदल झाला आहे. त्सुनामी  तंत्रज्ञान  विकसित केले जात असून यामुळे सैन्यदलाला भविष्यातील युद्ध लढण्यासाठी पुनर्रचना करावी लागेल.  विनाशकारी तंत्रज्ञानाच्या परिणामाच्या विविध पैलूंवर उपाययोजना करण्यासाठी महू येथील -आर्मी वॉर कॉलेज, येथे 24-25 ऑगस्ट 2020  पासून संरक्षण आणि रणनीती चर्चासत्र  2020 चा भाग म्हणून भविष्यातील संघर्षामध्ये आपल्या लढाई तत्त्वज्ञानावर विनाशकारी  तंत्रज्ञानाचा प्रभाव या विषयावर चर्चासत्राचे आयोजन केले होते. कोविड 19 च्या निर्बंधामुळे हा कार्यक्रम देशाच्या कानाकोपऱ्यात 54  ठिकाणी वेबिनार  आयोजित करण्यात आला होता.

चर्चासत्राच्या पॅनेलिस्ट लष्करी बाबीतील तज्ञ , तंत्रज्ञ, शिक्षणतज्ज्ञ आणि या विषयावरील वक्ते  संबंधित विषयांवर चर्चा करून  आणि कल्पना मांडून औपचारिक कागदपत्रे आणि सिद्धांत विकसित करणार आहेत. लेफ्टनंट जनरल राज शुक्ला, जीओसी-इन-सी, एआरटीआरएसी यांच्या भाषणाने या वेबिनारची सुरुवात झाली. क्लाउड  कंप्यूटिंग, आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय), ऑगमेंटेड रियल्टी / व्हर्च्युअल रिअलिटी (एआर / व्हीआर), रोबोटिक्स, बिग डेटा अनॅलिटीक्स , सायबर, स्मॉल सॅटेलाईट, 5 जी / 6 जी, क्वांटम कंप्यूटिंग आणि सायबर वॉरफेअर सारख्या विनाशकारी  तंत्रज्ञानावर चर्चा झाली.हे चर्चासत्र  हा भारतीय लष्करासाठी राष्ट्रीय महत्त्व असलेल्या सैद्धांतिक आणि सामरिक मुद्द्यांकडे लक्ष वेधणारा होता आणि यामुळे जटिल संकल्पना जाणून घेता आल्या.

भारतीय लष्कराला मोलाचे धोरणात्मक मार्गदर्शन करण्यासाठी 25 ऑगस्ट 2020 रोजी लष्करप्रमुख जनरल एम.एम. नरवणे उपस्थित होते. त्यांनी युद्ध लढण्यावर आणि युद्धातील विघटनकारी तंत्रज्ञानाच्या परिणामाबाबत मार्गदर्शन केले.आणि  सध्याची आधुनिकीकरण मोहीम विद्यमान शस्त्रे प्रणाली आणि प्लॅटफॉर्म अद्ययावत  करण्यावर केंद्रित आहे आणि भारतीय सशस्त्र सैन्याला दुहेरी उपयोग असलेल्या उपलब्ध विनाशकारी तंत्रज्ञानावर पुरेसा भर  द्यावा लागेल . त्यांनी शिफारस केली की लष्करी अनुप्रयोगांमध्ये उत्पादनांची आवश्यकता आणि ती एकत्रित करण्यासाठी आवश्यक असलेले राष्ट्रीय मिशन सैन्य दलांच्या आधुनिकीकरणाच्या धोरणाचा भाग बनले  पाहिजे.

अशा प्रकारचे हे पहिलेच चर्चासत्र होते  आणि त्याच्या यशस्वी आयोजनाबद्दल लष्करप्रमुखांनी आर्मी वॉर कॉलेजचे कौतुक केले.

 

B.Gokhale /S.Kane/P.Malandkar

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1648620) Visitor Counter : 202