रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय
केंद्रीय मंत्री नीतीन गडकरी मध्य प्रदेशात 9400 कोटीहून जास्त खर्चाच्या 35 महामार्ग प्रकल्पांचे भूमिपूजन आणि उद्घाटन करणार
हे प्रकल्प जलद विकासाला चालना देणार आणि चांगल्या दळणवळण सुविधा निर्माण करणार
Posted On:
23 AUG 2020 5:28PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 23 ऑगस्ट 2020
केंद्रीय रस्ते वाहतूक, महामार्ग आणि एमएसएमई मंत्री नितीन गडकरी मंगळवारी 25 ऑगस्ट 2020 रोजी मध्य प्रदेशात 35 महामार्ग प्रकल्पांचे भूमिपूजन आणि उद्घाटन करणार आहेत.
मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असतील. केंद्रीय मंत्री थावरचंद गेहलोत, नरेंद्र सिंग तोमर, राज्यमंत्री प्रल्हाद सिंग पटेल, फग्गन सिंग कुलस्ते आणि जनरल(डॉ.) व्ही. के. सिंग(निवृत्त) यांच्यासह मध्य प्रदेशचे मंत्री, आमदार आणि केंद्र आणि राज्यातील वरिष्ठ अधिकारी देखील या कार्यक्रमात सहभागी होतील. भूमिपूजन आणि उद्घाटन होणाऱ्या प्रकल्पांमध्ये 1139 किलोमीटर लांबीच्या रस्त्यांचा समावेश आहे आणि त्यांच्या बांधणीसाठी 9400 कोटी रुपये खर्चाची तरतूद आहे. मध्य प्रदेशच्या विकासाचा मार्ग खुला करताना हे प्रकल्प चांगल्या दळणवळण सुविधा, आरामदायी प्रवास आणि आर्थिक विकासाला चालना देणार आहेत.चांगल्या रस्त्यांमुळे प्रवासी आणि मालवाहतूक करणारे चालक या दोघांचाही प्रवासाचा वेळ वाचणार आहे. विनाअडथळा प्रवासामुळे वाहनांमधून प्रदूषकांचे उत्सर्जन कमी होत असल्याने प्रदूषणात घट व्हायलाही यामुळे मदत होणार आहे.
या प्रकल्पांच्या यादीसाठी येथे क्लिक करा
* * *
B.Gokhale/S.Patil/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1648071)
Visitor Counter : 131